Rabi Jowar Agrowon
ताज्या बातम्या

Jowar Sowing : पांडे परिसरात ज्वारीच्या पेरणीत घट

ज्वारीचे कोठार समजल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्यातील पूर्व भागामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबल्या आहेत.

टीम ॲग्रोवन

पांडे, ता. ५ : ज्वारीचे कोठार (Jowar Hub) समजल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्यातील पूर्व भागामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या (Rabi Sowing) लांबल्या आहेत. ज्वारी पिकाच्या पेरणीत (Jowar Sowing) घट होऊन गहू (Wheat), हरभरा (Chana), मका (Maize), कांदा (Onion), ऊस (Sugarcane) या पिकांत वाढ झाली आहे.

मात्र सततच्या पावसामुळे खरिपाच्या पिकांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे.

अतिपावसाने रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी लांबली आहे. काही क्षेत्रामध्ये ज्वारी पेरणी झाली होती. परंतु, अतिवृष्टीमुळे ज्वारी उगवलीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट आले आहे.

पावसामुळे शेतामध्ये तण वाढले आहे. तण काढून पेरणी करायला वेळ लागत सल्याने ज्वारी पेरणीला उशीर होत आहे.इतर पिकांबरोबर जनावरांना वर्ष भर लागणारा कडबा लागत आहे. त्यामुळे दुबार पेरणी करून ज्वारी पेरणी करणार आहे.
सचिन भोसले, शेतकरी, पांडे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम

Indian Seed Industry: तीन हजारांवर सामंजस्य करार

Nitish Kumar Oath Ceremony: नितीशकुमार दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदी

Solar Power: सौरऊर्जा परिवर्तनाचे साधन

Market News: खानदेशात केळी दरांवर चार महिन्यांपासून दबाव

SCROLL FOR NEXT