Paddy Production Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Rate : धानाला किमान चार हजार रुपये जाहीर करा

महाराष्ट्रातील इडी सरकारने धानाला हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली. गरीब शेतकऱ्याला हे सरकारचे गणित समजले नाही.

Team Agrowon

नागपूर : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या आधारे दुप्पट नफा देण्याची घोषणा करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) धानाला (Paddy Rate) किमान चार हजार रुपये प्रतिक्विंटल जाहीर करावेत, अन्यथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघ वृक्षारोपण करून शेतकऱ्यांना जागृत करण्याचे काम करेल.

त्यांच्या हक्कांसाठी जनशक्तीला एकजूट करू, असा इशारा माजी खासदार आणि अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे खुशाल बोपचे यांनी दिला आहे.

नागपूर करारानुसार या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी एक महिन्याचा असायला हवा, मात्र गेल्या काही वर्षांपासून नागपूर करार केवळ कागदांवर मर्यादित राहिला आहे. या अधिवेशनातही विदर्भावर अन्यायच झाला आहे. हा अन्याय दू करावा, असेही बोपचे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील इडी सरकारने धानाला हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली. गरीब शेतकऱ्याला हे सरकारचे गणित समजले नाही. २०२० मध्ये तत्कालीन सरकारने ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस दिला होता.

आता घोषणा केली, तर ही योजना फक्त दोन हेक्टरसाठी लागू झाली. या योजनेपासून दोन हेक्‍टर क्षेत्र वंचित राहणार आहे. प्रतिक्विंटल ३७५ रुपये बोनस मिळणार आहे आणि २ हेक्टरवरील शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार आहेत. ‘भीक नको पण कुत्रा आवर’, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Umed Platform: महिला बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी ई- उमेद प्लॅटफॉर्म

Congress Protest: ‘मनरेगा’ रद्दविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

Water Meter: पाणीपुरवठा संस्थांना नाही बसणार मीटर : डॉ. पाटणकर

Okra Cultivation: जळगाव जिल्ह्यात भेंडी लागवडीला वेग

Mahavistar AI: ‘महाविस्तार’ ॲपचा वापर करून शेतीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा

SCROLL FOR NEXT