Mahanand Milk  Agrowon
ताज्या बातम्या

Mahanand Milk : महानंद बाबत तोडगा नाहीच

दिवाळखोरीत निघालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाबाबत (महानंद) नेमकी कोणती धोरणात्मक पावले उचलावी, या विषयी राज्य शासन अद्यापही संभ्रमात आहे.

Team Agrowon

पुणे ः दिवाळखोरीत निघालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाबाबत (महानंद) (Mahanand Milk ) नेमकी कोणती धोरणात्मक पावले उचलावी, या विषयी राज्य शासन अद्यापही संभ्रमात आहे. या बाबत दूध संघांसोबत राज्य शासनाने गुरुवारी (ता.३) घेतलेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही.

राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात दूध संघांसोबत चर्चा केली. ‘महानंद’चे दूधसंकलन आता दीड लाखावरून २०-२५ हजारांवर आले आहे. “राज्यातील दूध संघ यापुढेही महानंदला दूधपुरवठा करण्यास तयार आहेत. मात्र, ‘महानंद’कडून दूधखरेदीची देयके वेळोवेळी अदा होणे गरजेचे आहे. कारण देयके अदा न झाल्यास संघांना शेतकऱ्यांना खरेदीबिले चुकती करण्यात अडचणी येतील,” असे संघांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

विखे यांनी संघांच्या विविध प्रतिनिधींचे मुद्दे समजून घेतले. मात्र कोणताही तोडगा या वेळी निघू शकला नाही. या बाबत गुरुवारी (ता.१०) पुन्हा बैठक घेतला आहे. ‘महानंद’वर गैरभाराचा ठपका ठेवला गेला आहे. अखेर संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाच्या हाती कारभार देण्यात आला आहे. मात्र आता दुधाचा पूर्ण व्यवसाय धोक्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bordeaux Paste: फळझाडांसाठी बोर्डो पेस्ट घरच्या घरी कसे बनवावे?

Goat Theft: घरासमोरून २३ शेळ्या, दोन बोकडांची चोरी

Employee Salary Delay: ‘जलजीवन’च्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत

Farmers Demand: शेतीपंपाचे वीस एचपीपर्यंतचे वीजबिल माफ करा

Turmeric Farming: हळदीची मूल्यसाखळी विकसित करावी लागेल : विलास शिंदे

SCROLL FOR NEXT