Banana Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Banana Crop Damage : वादळी वाऱ्याने केळीचे नुकसान

Monsoon Update : मोहोळ तालुक्यातील काही भागात रविवारी (ता. ४) सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचे व आंब्याचे मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

Solapur News : मोहोळ तालुक्यातील काही भागात रविवारी (ता. ४) सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचे व आंब्याचे मोठे नुकसान झाले. पापरी, खंडाळी, चिखली, येवती यासह अन्य गावातील केळी बागा भुईसपाट झाल्याने पिकांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, प्रत्यक्षात पंचनामे झाल्यावरच खऱ्या नुकसानीचा आकडा समोर येणार आहे. दरम्यान तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी संबंधित तलाठ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.

रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक मोठ्या वादळी वाऱ्याला सुरवात झाली. आकाशात काळे ढग जमा होऊ लागले होते. वाऱ्याच्या वेग इतका प्रचंड होता की उतरावयास आलेल्या केळी बागा भुईसपाट झाल्या.एका तासात होत्याचे नव्हते झाले. ऊसा खालोखाल शेतकऱ्यांनी केळी लागवडीला प्राधान्य दिले आहे.

ऊसा एवढेच पैसे कमी खर्चात केळीचे होतात. पापरी येथील राजेंद्र शेळके यांची केळी बाग उतरावयास आली आहे. शुक्रवारी धार्मिक विधी करून व्यापाऱ्यांबरोबर व्यवहारही झाला होता. मात्र रविवारी निसर्गाने अचानक तोंडचा घास हिरावून घेतला, त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

पापरी येथील राजाभाऊ शेळके यांच्यासह सज्जन टेकळे, पवन घागरे, शत्रुघ्न टेकळे, संजय भोसले, पांडुरंग भोसले, नामदेव मोरे, शंकर पाटील, गोरख गायकवाड, शंकर गायकवाड, यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या त्या गावातील तलाठ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
-प्रशांत बेडसे, तहसीलदार, मोहोळ
लाखो रुपये खर्च करून मी केळीची बाग जोपासली आहे. मात्र निसर्गाने तोंडचा घास हिरावून घेतला, त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकी कशी शेती करावी व कोणती पिके करावीत हे काय समजेना
-राजेंद्र शेळके, शेतकरी पापरी, ता. मोहोळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales: मॉन्सूनमुळे ट्रॅक्टर विक्रीला 'बुस्ट'; गेल्यावर्षीच्या तुलनेत विक्री वाढली

Micronutrients Management : पीकवाढीसाठी मंगल, तांबे आवश्यक

Sushila Karki: सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान

Drone Subsidy Scheme: ड्रोन खरेदीसाठी मिळणार ५ लाख रुपयांपर्यंत अनुदान; जाणून घ्या संपुर्ण माहिती

Vermicopmpost Production : उभारला गांडूळ खत निर्मितीचा स्टार्टअप

SCROLL FOR NEXT