Hailstorms Agrowon
ताज्या बातम्या

Hailstorm Crop Damage : सलग तिसऱ्या दिवशीच्यागारपिटीने नुकसानीत वाढ

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ६६ मंडलांत शुक्रवारी (ता. २८) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यांतील बहुतांश महसूल मंडलांत वादळी पाऊस, गारपीट सुरू आहे.

Team Agrowon

Parbhani News परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ६६ मंडलांत शुक्रवारी (ता. २८) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत वादळी वाऱ्यासह गारपीट (Hailstorm) झाली. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यांतील बहुतांश महसूल मंडलांत वादळी पाऊस, गारपीट सुरू आहे.

परिणामी, आंबा, केळी, पपई आदी फळपिके, कांदा बीजोत्पादन, भाजीपाला पिकांसह उन्हाळी बाजरी, ज्वारी, सोयबीन, हळदीचे नुकसान (Crop Damage) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

दोन्ही जिल्ह्यांत वादळामुळे विजेच्या तारा तुटल्या आहेत. अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. घरे, आखाड्यावरील पत्रे उडून गेले आहेत. ज्वारीच्या कडब्याच्या पेंढ्या उडून गेल्या. शेडनेटगृहाचे नुकसान झाले आहे.

परभणी जिल्ह्यातील ४१ मंडलांत शुक्रवारी हलका ते जोरदार पाऊस झाला. जिंतूर तालुक्यातील जिंतूर, सावंगी म्हाळसा, बामणी, चारठाणा मंडलात, सेलू तालुक्यातील चिकलठाणा, मोरेगाव मंडलात, मानवत तालुक्यातील केकरजवळा, रामपुरी मंडलात, पाथरी तालुक्यातील बाभळगाव मंडल, सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ, आवलगाव, वडगाव मंडले, गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड, राणीसावरगाव मंडले, पालम तालुक्यातील पालम, चाटोरी, बनवस मंडलात जोरदार पावसासह गारपीट झाली.

हिंगोली जिल्ह्यातील २५ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली तालुक्यातील सिरसम, कळमनुरी तालुक्यातील वाकोडी, नांदापूर, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, आजेगाव, साखरा, पानकनेरगाव, हत्ता मंडलात पावसाचा जोर राहिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Farming: एकात्मिक दुग्धव्यवसायातून पशूसखी होताहेत सक्षम

Agriculture Success Story: ज्योतीताईंनी शोधल्या प्रगतीच्या वाटा

Weekly Weather: राज्यात सौम्य थंडीची शक्यता

Farmer Loan Waiver: द्राक्ष उत्पादकांची संपूर्ण कर्जमाफी करा

Crop Insurance Issue: बटाट्याचे क्षेत्र वाढूनही पीकविम्यात समावेश नाही

SCROLL FOR NEXT