Mandous Cyclone Agrowon
ताज्या बातम्या

Mandous Cyclone : चक्रीवादळ आज धडकणार

बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून गुरुवारी (ता. ८) ‘मनडूस’ चक्रीवादळ तयार झाले आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : बंगालचा उपसागरात गुरुवारी (ता. ८) ‘मनडूस’ चक्रीवादळाची (Mandous Cyclone) निर्मिती झाली आहे. पूर्व किनाऱ्याकडे झेपावत असलेली वादळी प्रणाली आज (ता. १०) सकाळपर्यंत पूर्व किनाऱ्यावरील पदुच्चेरी, श्रीहरिकोटा ते महाबलीपूरम दरम्यान किनाऱ्याला धडकणार आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.

बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून गुरुवारी (ता. ८) ‘मनडूस’ चक्रीवादळ तयार झाले आहे. शुक्रवारी (ता. ९) सकाळपासून चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे.

दुपारी ही प्रणाली कारईकलपासून आग्नेयेकडे १८० किलोमीटर, तर चेन्नईपासून २६० किलोमीटर आग्नेयेकडे होती. चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेशसह, केरळ, तमिळनाडू, तेलगंणा, ओडिशा, श्रीलंकेत मुसळधार पाऊस पडत आहे.

महाराष्ट्रातही ढग जमा होत असून, आजपासून पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. ९) मध्यरात्री ते आज (ता. १०) सकाळपर्यंत ताशी ६५ ते ८५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह हे वादळ उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला धडकेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Processing Business: मत्स्य प्रक्रिया व्यवसायासाठी क्लाउड किचन, फूड ट्रक

Flower Fertilizer: निर्माल्यातून तीन टन खतनिर्मिती

Maharashtra Farmer Issue: पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीनंतर शेतकऱ्याची आत्महत्या

Rice Farming: पावसामुळे भातशेती बहरली

Rainfall Impact: पर्जन्यमापकाच्या कचाट्यात सापडला शेतकरी

SCROLL FOR NEXT