Paddy Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Cultivation : वाडा कोलम भाताची आठ एकरांत लागवड

बहुउद्देशीय शेती उत्पादन सहकारी संस्थेचे सभासद मोहन सावंत व विनायक सावंत या शेतकऱ्यांनी आंबिस्ते या गावी आपल्या सहा एकर क्षेत्र असलेल्या शेतीत वाडा कोलम व दोन एकरात सुरती कोलम या वाणांची उन्हाळी हंगामात लागवड केली आहे.

Team Agrowon

Wada Kolam Paddy Cultivation वाडा, जि. पालघर : तालुक्यातील बहुद्देशीय शेती संस्थेच्या वाडा कोलम (Wada Kolam Paddy Verity) या वाणाला सन २१/२२ मध्ये राष्ट्रीय स्तरावर नामांकन प्राप्त झाले आहे.

त्यामुळे देशभरात वाडा कोलमची विक्री केली जात आहे. यामुळे बहुद्देशीय शेती उत्पादन संस्थेच्या सभासदांनी या वर्षांत सहा एकर क्षेत्रात वाडा कोलम वाणाची उन्हाळी लागवड (Paddy Cultivation) केली आहे.

बहुउद्देशीय शेती उत्पादन सहकारी संस्थेचे सभासद मोहन सावंत व विनायक सावंत या शेतकऱ्यांनी आंबिस्ते या गावी आपल्या सहा एकर क्षेत्र असलेल्या शेतीत वाडा कोलम व दोन एकरात सुरती कोलम या वाणांची उन्हाळी हंगामात लागवड केली आहे.

वाडा कोलमला राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाल्यानंतर वाड्यातील शेतकऱ्यांकडून या वाणाची लागवड केली जात आहे. या वाणाला बाजारात चांगला भाव मिळतो. लहान, लांबट आकाराचा दाणा व सुवासिकपणा असल्याने वाडा कोलम व सुरती कोलमला भारतात व बाहेरील देशातून मागणी असते.

उन्हाळी भात लागवडीबद्दल वाड्यातील कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. या उन्हाळी भातशेतीला निवृत्त जिल्हाधिकारी भालचंद्र ठाकरे व वैभव पाटील यांनी भेट देऊन सावंत बंधूनी वाडा कोलम लागवडीबाबत अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo 8th Installment : नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्यासाठी निधी मंजूर; शासन निर्णय जारी

Dharashiv ZP Development: सुविधा, नावीन्यपूर्ण योजनांना प्राधान्य

ASHA Workers Honorarium: गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविकांना नियमित मानधन देण्याबाबत आरोग्यमंत्री काय म्हणाले?

Wheat Harvesting Tips: गव्हाची काढणी, मळणी आणि साठवण करताना काय काळजी घ्याल?

Crop Insurance Delay: स्थगिती नसताना शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा का अडवला?

SCROLL FOR NEXT