Farmer Crisis: मुक्ताईनगर तालुक्यात पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तालुक्यात तातडीने पिकांचे पंचनामे करावेत, कोरडा दुष्काळ जाहीर करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यावर जमा करावी, या मागण्यांचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले..तालुक्यात ऐनगरजेच्या वेळी पावसाने पाठ फिरविल्याने केळी, कापूस, मका, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग व तीळ यांसारख्या सर्वच खरीप व बागायती पिकांची वाढ खुंटली आहे. बियाणे, खते, औषधे, मशागत व सिंचनावर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. मात्र, पिके वाळू लागल्याने शेतकरी कर्जबाजारीपणा व उपासमारीच्या उंबरठ्यावर उभा आहे. .Soybean Crop Crisis: पश्चिम विदर्भात सोयाबीन हातातून जाण्याची भीती.म्हणून तालुक्यात कोरडा दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, सर्व शेतशिवारांत प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने सरसकट पिकांचे पंचनामे करावेत, कोणतीही किचकट अट न लावता शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये थेट मदत द्यावी, प्रलंबित व चालू वर्षाची पीकविमा भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, .Agriculture Crisis : पिके करपली, चारा संपला.शेती कर्जाच्या वसुलीस त्वरित स्थगिती देऊन कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, सिंचनासाठी नियमित वीजपुरवठा करावा, नादुरुस्त डीपी दुरुस्त कराव्या व नवीन डीपी उपलब्ध करून द्याव्यात,.ई-पीक पाहणीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी, दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकरी पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, जनावरांसाठी चारा-पाणी व गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.