Pune APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election : बाजार समिती निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गर्दी

पुण्या (हवेली) सह जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी, सोमवारी (ता.३) विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती.

Team Agrowon

Pune News पुण्या (हवेली) सह जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी (APMC Election) शेवटच्या दिवशी, सोमवारी (ता.३) विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती.

या गर्दीमध्ये कागदपत्रांसह सूचक अनुमोदकांची जुळवाजुळव करताना बाजार समितीच्या आवारात धावपळ होती. विविध इच्छुकांनी अर्ज भरले जरी असले तरी अर्ज माघारीनंतर अंतिम लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

पुणे (हवेली) बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गुलटेकडी येथील मुख्यालयात सोमवारी (ता ३) सकाळपासूनच कार्यकर्ते आणि नेत्यांनी गर्दी केली होती.

विविध पक्षांचे कार्यकर्ते वाजतगाजत अर्ज दाखल करीत होते. २० वर्षांनतर पुणे बाजार समितीची निवडणूक होत असल्याने २० वर्षांपूर्वीची एक पिढी निवृत्त झाली. नवीन पिढीमध्ये अनेक जण इच्छुक असल्याने सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.

यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या भूमिका गुलदस्त्यात ठेवून, सर्वच इच्छुक उमेदवारांना विविध संदेशांद्वारे अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे नक्की अधिकृत उमेदवारी कोणाला याबाबत धाकधूक वाढली आहे. तरी विविध कार्यकर्त्यांनी आपणच अधिकृत असल्याचे दावे केले आहेत.

जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आदी विविध तालुका बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहे. या बाजार समित्यांमध्ये देखील विविध पक्षांतील इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली असून, बंडखोरी टाळण्यासाठी विविध पक्ष अधिकृत पॅनेल जाहीर करणार नसल्याचे विविध नेत्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीत फूट

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुका आणि विधानपरिषद, पदवीधर निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढवीत यश मिळविले. मात्र बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत फूट पडली असल्याचे सध्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील पुणे वगळता सर्वांत मोठी बाजार समिती असलेल्या जुन्नर बाजार समितीमध्ये शिवसेना (ठाकरे) गट स्वतंत्र लढणार असल्याचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी जाहीर केले आहे. तर, आंबेगावमध्ये शिवसेना (शिंदेगट) आणि भाजप एकत्रित लढणार असल्याचे शिंदे गटाचे उपनेते शिवाजीराव आढळराव यांनी जाहीर केले आहे.

भाजपची भूमिका गुलदस्त्यात

पुणे (हवेली) बाजार समिती क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. या निवडणुकीत भाजप मूळच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षात घेऊन नशीब अजमावत आहेत. तर शिंदे गटातून माजी मंत्री विजय शिवतरे हे देखील चाचपणी करीत असून, चंचुप्रवेश करण्यासाठी धडपड करीत आहेत.

दोन दादांची प्रतिष्ठा पणाला

पुणे जिल्ह्यातील सहकार आणि बाजार समित्यांवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व आहे. पवार हे अनेक वर्षे पालकमंत्री देखील राहिले होते.

मात्र, सध्या चंद्रकात पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री असून, जिल्ह्यातील सहकार क्षेत्राबरोबरच बाजार समित्यांवर वर्चस्व मिळविण्यासाठी धडपडत आहेत. यामुळे सध्याच्या बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही दादांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT