Crop Insurance
Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : ‘बीड पॅटर्न’ धुमधडाक्यात

टीम ॲग्रोवन

पुणे ः पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी (PM Crop Insurance Scheme) ‘बीड पॅटर्न’च्या (Beed Pattern) पहिल्याच खरीप हंगामात (Kharif Season) शेतकऱ्यांनी पहिल्या दिवसापासून विमा हप्ता (Insurance Premium) भरण्यासाठी गर्दी केली. आतापर्यंत ४० हजार शेतकऱ्यांनी योजनेत भाग घेतला, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

विमा योजनेत बीड पॅटर्न लागू झाल्याचा निर्णय एक जुलै रोजी सायंकाळी घेतल्यानंतर कृषी विभागाने जलद हालचाली करीत शेतकऱ्यांसाठी संकेतस्थळ दुसऱ्याच दिवशी सुरू केले. त्यामुळे राज्यभरातून विमा अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. “योजनेत बदल केल्यानंतरदेखील कोणत्याही अडथळ्याविना योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे,” अशी माहिती कृषी विभागातून सांगण्यात आली.

‘बीड पॅटर्न’मुळे विमा हप्त्याचे दायित्व गुणोत्तर ८०:११० असे ठेवले गेले आहे. त्यामुळे विमा कंपन्यांना यंदा मर्यादित नफा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. मुख्यत्वे सोयाबीन, कापूससह धान, खरीप ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर, मका, कांदा या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. विमा कंपन्यांनी राज्यभर पीक विमा जागृती सप्ताह सुरू केला आहे. त्यासाठी सरकारी व खासगी विमा कंपन्यांनी प्रचार रथ तयार केले आहेत. गावोगावी या रथांद्वारे विमा योजनेची माहिती दिली जात असून शेतकऱ्यांच्या शंकानिरसन केले जात आहे.

“राज्यात गेल्या खरिपाच्या सुरुवातीला मॉन्सूनचा पाऊस सरासरीच्या ११२ टक्क्यांपर्यंत झालेला होता. यंदा तो ९० टक्क्यांपर्यंत दिसतो आहे. जुलैमध्ये राज्याच्या सर्व भागात मॉन्सून चांगला बरसला तर खरिपातील सर्व पेरण्यांमधील उगवणींचा टप्पा समस्यामुक्त राहील,” असे सूत्रांनी स्पष्ट केले.

विमा योजना सुरू होताच पहिल्या ७२ तासांत राज्यातील ८,३८३ शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले. अर्जासोबत विमा हप्त्यापोटी ५१ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा भरणाही केला. मंगळवारी दुपारपर्यंत (ता. ५) राज्यभर ४०,७८२ शेतकऱ्यांनी २.५६ कोटी रुपये विमा हप्ता भरत योजनेत सहभाग नोंदवला होता.

विमा संरक्षण ठरणार महत्त्वाचे

जूनमध्ये पावसाचा खंड आल्यामुळे काही भागांमध्ये पिकांच्या उगवणक्षमतेवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे विमा संरक्षण महत्त्वाचे ठरू शकते. जूनमध्ये राज्यात सरासरीच्या २०७ मिलिमीटरच्या फक्त ७१ टक्के म्हणजे १४७ मिलिमीटरपर्यंत पाऊस झालेला आहे. नागपूर विभागात जूनमध्ये सरासरीच्या ६३ टक्के, कोकणात ६८ टक्के तर अमरावती विभागात ७२ टक्के पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

SCROLL FOR NEXT