Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Raver Lok Sabha : रावेर लोकसभा मतदार संघात २०१९ मध्ये झालेली पंचवार्षिक निवडणूक ही केळीसह मेगा रिचार्ज, उड्डाण पूल, टेक्स्टाइल पार्क आणि राष्ट्रीय महामार्ग या प्रश्‍नांभोवती फिरली होती.
Banana
BananaAgrowon

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदार संघात २०१९ मध्ये झालेली पंचवार्षिक निवडणूक ही केळीसह मेगा रिचार्ज, उड्डाण पूल, टेक्स्टाइल पार्क आणि राष्ट्रीय महामार्ग या प्रश्‍नांभोवती फिरली होती. यातील एखाद- दुसऱ्या कामाचा अपवाद वगळता बहुसंख्य कामे अजूनही मार्गी लागलेली नाहीत.

बऱ्हाणपूर - अंकलेश्‍वर महामार्गाचा डीपीआर झाला आहे, असे दावे लोकप्रतिनिधी करतात. प्रत्यक्षात या रस्त्याचा डीपीआर अगदी अलीकडे सुमारे चार महिन्यांपूर्वी झाला. मात्र हा रस्ता रावेर शहराजवळून व रावेर तालुक्याच्या पूर्व भागातून नेण्याऐवजी केंद्र सरकारच्या राजपत्रात तो मुक्ताईनगर तालुक्यातून नेण्याचे नियोजन असल्याने रावेरसह अंतुर्ली भागातही शेतकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे.

Banana
Banana Market : खानदेशात केळीची आवक वाढली; दरात नरमाई

जामनेरात टेक्स्टाइल पार्क उभारण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र त्यासंदर्भात अजून काही हालचाल दिसून येत नाही. मेगा रिचार्ज या योजनेचे भूमिपूजन लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते करू, अशी घोषणाही करण्यात आली. परंतु त्याचाही मुहूर्त अद्याप लागलेला नाही.

Banana
Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

निंभोरा येथील उड्डाण पूल पूर्ण झाला. मात्र रावेर तालुक्यातील सावदा आणि रावेर या दोन्ही रेल्वे स्थानकांजवळील उड्डाण पुलांचा प्रश्‍न अजूनही प्रलंबित आहे. सावदा येथील उड्डाण पुलाचे काम बंद पडले असून, रावेर येथील पुलाचे कामही अपूर्ण अवस्थेत आहे.

केळी या पिकाला फळाचा दर्जा देण्याबाबत लोकप्रतिनिधींनी अनेकदा घोषणा केल्या मात्र नुसते कागदोपत्री दर्जा देऊन उपयोग नाही तर आंबा, द्राक्ष, संत्री, मोसंबी या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीनंतर त्यांना ज्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळते ती केळीला मिळवून देण्याचे आश्‍वासन देऊनही लोकप्रतिनिधी कमी पडले असेच म्हणावे लागेल. केंद्र सरकारच्या युवक, महिला दिव्यांग यांच्यासाठीच्या विविध योजना तालुक्यात यशस्वीपणे राबविल्या गेल्या, मात्र तालुक्यात प्रकल्प उभारून युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात अपयश आल्याचे बोलले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com