Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अकरा हजार हेक्टरवरील पीक पाण्यात

यंदा रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्याने हंगामात चौथ्यांदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील तब्बल ११ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने (Heavy Rainfall) धुमाकूळ घातला. यंदा रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्याने हंगामात चौथ्यांदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील तब्बल ११ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Economical Damage)फटका बसला आहे.

यंदा अतिवृष्टीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. गेल्या जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पूरपरिस्थितीनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अनेक तालुक्यांना भेट देत पाहणी केली.

पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. सततच्या पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिके पाण्यात गेली. ऑगस्ट महिन्यातही पावसाने जोरदार बॅटिंग केली. अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. शेतातील उभे पीक पाऊस व पुरामुळे आडवे झाले. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली असून, थोडा दिलासा मिळाला असला तरी परतीच्या पावसाने पुन्हा शेतकऱ्यांसमोर संकट उभे केले आहे.

ऑक्टोबर महिन्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसाने आतापर्यंत ११ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. खरीप हंगाम यंदा पाण्यातच गेला असून, अजूनही पावसाचे सावट कायम आहे. सततच्या पावसाने पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले असून, कपाशीवर काही ठिकाणी बोंडसळचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

बोरी परिसरात पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टीनंतर वाचलेल्या पिकांतून काही तरी घरी येईल, अशी अपेक्षा होती. आता परतीच्या पावसाने ती आशाही मावळली आहे. पावसाने नुकसान खूप झाले असून, शासनाने भरीव मदत देणे गरजेचे आहे.

-नाना राऊत, शेतकरी, बोरी चंद्रशेखर.

हातगाव शिवारात पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन काढणीला असताना पाण्यात सापडले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे.

- रवी अवचट, सरपंच, हातगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT