गतवर्षीच्या खरिपातील विमा परतावा अद्याप प्रलंबित 
ताज्या बातम्या

Crop Insurance : तीन तालुक्यांतील ६१ कोटींवर पीकविमा प्रलंबित

परभणी जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२० आणि रब्बी हंगाम २०२०-२१ मधील सोनपेठ, गंगाखेड, पालम तालुक्यांतील ८४ हजार ६९३ शेतकऱ्यांचा विविध पिकांची मिळून एकूण ६१ कोटी १५ लाख रुपये एवढी पीकविमा परतावा प्रलंबित आहे.

Team Agrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२० आणि रब्बी हंगाम २०२०-२१ मधील सोनपेठ, गंगाखेड, पालम तालुक्यांतील ८४ हजार ६९३ शेतकऱ्यांचा विविध पिकांची मिळून एकूण ६१ कोटी १५ लाख रुपये एवढी पीकविमा परतावा प्रलंबित आहे. खरीप हंगाम (Kharif Season) २०२० मधील सोयाबीन (Soybean) आणि तूर (Tur) मिळून एकूण ७२ हजार ३९३ शेतकऱ्यांच्या ३० हजार ६१६ हेक्टरवरील पिकांचा ५५ कोटी १० लाख रुपये आणि रब्बी हंगाम (Rabi Season) २०२०-२१ मधील ज्वारीचा १२ हजार ३०० शेतकऱ्यांच्या ६ कोटी ५ लाख रुपये पीकविमा परतावा प्रलंबित आहे. खरीप हंगाम २०२० मधील सोयाबीनचा शेळगाव (ता. सोनपेठ) मंडलातील ३ हजार ४९५  शेतकऱ्यांचा ६ कोटी ५८ लाख रुपये, पिंपळदरी (ता. गंगाखेड) मंडलातील ९ हजार ७२३ शेतकऱ्यांचा १३ कोटी ३८ लाख रुपये विमा परताव्याचा समावेश आहे. तूर पिकाचा पालम तालुक्यातील पालम, बनवस, चाटोरी, रावराजूर, पेठशिवणी मंडलातील ६ हजार ४६६ हेक्टर क्षेत्राचा १८ कोटी १७ लाख रुपये, गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, राणीसावरगाव, पिंपळदरी, गंगाखेड या मंडलांतील ४ हजार ३२५ हेक्टर क्षेत्राचा ११ कोटी ५१ लाख रुपये विमा परतावा प्रलंबित आहे.

रब्बी हंगाम २०२०-२१ मधील ज्वारीचा पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा परतावा प्रलंबित आहे. त्यात रावराजूर मंडलातील १ हजार ३५९ शेतकऱ्यांचा १ कोटी ३९ लाख रुपये, बनवस मंडलातील १ हजार ३६४ शेतकऱ्यांचा १ कोटी विमा परताव्याचा समावेश आहे. . त्यामुळे पीकविम्याची थकीत रक्कम १२ टक्के व्याजासह मिळावा यासाठी अॅड. अजित काळे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठात याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती याचिकाकर्ते संघटनेचे तालुकाध्यक्ष (सोनपेठ) विश्‍वंभर गोरवे, हेमचंद्र शिंदे, माधव घून्नर यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT