Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अवकाळी पावसामुळे सात तालुक्यांना फटका

गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका सात तालुक्यांना बसला आहे. त्यापैकी दोन तालुक्यांतील सुमारे १९.१० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Crop Damage News पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) फटका सात तालुक्यांना बसला आहे.

त्यापैकी दोन तालुक्यांतील सुमारे १९.१० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे.

नुकसानीमुळे ६७ शेतकऱ्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. नजर अंदाजाच्या अहवालावरून ही स्थिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीबाबतचा नजर अंदाजाद्वारे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने नुकसानीची माहिती घेतली. त्यावरून या दोन तालुक्यांतील पिकांच्या नुकसानीची माहिती पुढे आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये जिराईत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान नसले तरी बागायती क्षेत्रावरील पिके आणि फळपिके मिळून सुमारे १९.१० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

हवेली, मुळशी, भोर, मावळ, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला. आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १८.२० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

हवेलीमध्ये ०. ८० मिमी, मुळशीत १.१७ मिमी, मावळमध्ये ८.७३ मिमी, जुन्नरमध्ये ६ मिमी, खेडमध्ये ४ मिमी आणि शिरुरमध्ये ०.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कृषी व महसुल विभागाने पिकांच्या नुकसानाची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील एका गावात द्राक्ष पीक, कांदा, गहू व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

तर खेड तालुक्यातील १३ गावांमधील १८.५० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने गहू, आंबा आणि भाजीपाला पिकांचा समावेश आहे.

याशिवाय, टोमॅटो, बाजरी, ज्वारी, भाजीपाला, फळपीके, कलिंगडे, फूलपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. जिल्ह्यात शेतीपिकांच्या नुकसानीमध्ये वाढ होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

तालुकानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)

तालुका ---गाव संख्या---नुकसानीचे क्षेत्र, हेक्टर---शेतकरी संख्या

आंबेगाव--- १---०.६०---२

खेड---१३ ---१८.५०---६५

एकूण---१४---१९.१०---६७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT