Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : खानदेशात वादळी पावसाने फळपिकांचे होत्याचे नव्हते

खानदेशात पावसामुळे शुक्रवारी (ता. २८) मोठी पीकहानी झाली आहे. फळपिकांची होत्याचे नव्हते, अशी स्थिती झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News खानदेशात पावसामुळे शुक्रवारी (ता. २८) मोठी पीकहानी (Crop Damage) झाली आहे. फळपिकांची होत्याचे नव्हते, अशी स्थिती झाली आहे. केळी, मका, कांदा व बाजरीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शुक्रवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात वादळी पाऊस झाला. कलाली, निम (ता. अमळनेर) येथे केळीचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यांवरील पत्रे उडून गेले. जळगाव, धरणगाव, चोपडा, जामनेर, एरंडोल, पारोळा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा आदी भागांत जोरदार पाऊस झाला.

त्यामुळे मळणीवर आलेला मका, बाजरी, केळी, कांदा आदी पिकांची मोठी हानी झाली. मक्याची कणसे भिजल्याने त्यांना कोंब येऊ शकतात, अशी स्थिती आहे. जळगाव, धरणगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा, जामनेरमध्ये पावसामुळे पीक कापणी, मळणी, केळीची काढणी आदी कामे ठप्प आहेत. शनिवारी (ता. २९) सकाळपासून पावसाळी वातावरण होते.

धुळ्यातील दिघावे (ता. साक्री) भागात पावसामुळे सोळा गाव काटवान परिसरातील शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. कांदा पीक पाण्यात भिजले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दिघावे ते म्हसदीपर्यंतच्या रस्त्यावर झाडे आडवी झाली. तसेच साक्रीमधील छाईल, दिघावे येथे पशुधन मृत्युमुखी पडले.

शेकडो हेक्टर केळी भुईसपाट

दोन दिवसांपासून कळंबू, जयनगरसह (ता. शहादा, जि. नंदुरबार) परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतीचे विशेषतः फळबागांचे अतोनात नुकसान झाले. गुरुवारच्या (ता. २७) पावसाने केळी, पपई पिकांचे मोठे नुकसान झाले. एका रात्रीत झालेल्या वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. शेकडो हेक्टरवरील केळी भुईसपाट झाली.

तत्काळ पंचनामे करा ः महाजन

गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

तसेच फळ पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांच्या (केळी, लिंबू आदी) पिकांचे नुकसान झाले असल्यास याबाबत तत्काळ पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विमा कंपनीस दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT