Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : हातकणंगले तालुक्यात९८९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका हातकणंगले तालुक्याला बसला आहे. जिल्ह्यातील ९८९ हेक्टर क्षेत्राला परतीच्या पावसाचा फटका बसला आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका हातकणंगले तालुक्याला बसला आहे. जिल्ह्यातील ९८९ हेक्टर क्षेत्राला परतीच्या पावसाचा (Heavy Rainfall) फटका बसला आहे.यापैकी हातकणंगले तालुक्यातील तब्बल ९३३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी (Makarand Kulkarni) यांनी दिली.

हातकलंगले तालुक्यात सोयाबीनचे सर्वाधिक ६४० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या खालोखाल भुईमुगाची १८६, तर भाजीपाल्याचे ६८ क्षेत्र पाण्याखाली जाऊन नुकसान झाले आहे.

भाताचे ३९ हेक्टर क्षेत्र खराब झाले आहे. पन्हाळा तालुक्यात भाताचे ११ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकाची मोठी हानी झाली आहे. अजूनही पाऊस सुरू असल्याने यात वाढच होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Recognition: महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांची माहिती

Pimpalgaon Baswant APMC: पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो खरेदीतील दरतफावतीला लगाम

Rain Deficit : नऊ महसूल मंडलांत २१ दिवसांचा पावसाचा खंड

Agricultural Drought : शेतशिवाराला दुष्काळाच्या झळा

Maharashtra Agriculture : परभणी जिल्ह्यात शुक्रवारपासून केवळ ‘एफएफएस’ ॲपद्वारे खत विक्री

SCROLL FOR NEXT