Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : परतीच्या पावसाने पिकांची दाणादाण

टीम ॲग्रोवन

हिंगोली ः गेल्या आठ दिवसांपासून हिंगोली, परभणी जिल्ह्यांत सुरू असलेल्या पावसामुळे (Heavy Rain) हाती आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले आहे. या दोन जिल्ह्यांत सोयाबीन (Soybean), कपाशी (Cotton), तूर आदी पिके मळे सुमारे ८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांची परतीच्या पावसामुळे (Monsoon Rain) दाणादाण झाली आहे.

या दोन जिल्ह्यात यंदा ८ लाख ५६ हजार ७७ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात सोयाबीन ५ लाख २७ हजार २२९ हेक्टरवर, कपाशीची लागवड २ लाख ११ हजार ६०६ हेक्टरवर, तुरीची ७७ हजार ९६ हेक्टर पेरणी झाली. अतिवृष्टी, सततच्या पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला असून ५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

२ लाखांहून अधिक हेक्टरवरील कपाशी, तसेच ७७ हजार हेक्टरवरील तूर, हजारो हेक्टरवरील हळद, ऊस, फळे, भाजीपाला पिके पावसामुळे बाधित झाली आहेत. सोयाबीनच्या शेंगावर बुरशीची वाढ झाली. दाणे डागील झाले आहेत. उघडीप नसल्याने मोड फुटत आहेत. फुटलेल्या बोंडातून कापूस लोंबत आहे. भिजून पिवळा पडला आहे. धाग्याची प्रत खराब झाली आहे. तुरीचे पीक उन्मळून गेले आहे.

परभणी व हिंगोलीची विमा संरक्षण स्थिती

परभणी ः जिल्ह्यात ५ लाख १० हजार ७२४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. त्यात सोयबीन २ लाख ६९ हजार ८०० हेक्टर, कपाशी १ लाख ७९ हजार ४४७ हेक्टर, तूर ३९ हजार ४८८ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. एकूण ६ लाख ७१ हजार ५७३ विमा प्रस्ताद्वारे शेतकऱ्यांनी ४ लाख ३८ हजार ८१२ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.

त्यात सोयाबीनसाठी ४ लाख ८ हजार ९४ शेतकऱ्यांनी ३ लाख ३४ हजार ९४ हेक्टर, कपाशीसाठी ६५ हजार ५६८ शेतकऱ्यांनी ३१ हजार १०४ हेक्टर, तुरीसाठी ९३ हजार ८२३ शेतकऱ्यांनी ३६ हजार ६३३ हेक्टरसाठी संरक्षण घेतले आहे.

हिंगोली ः जिल्ह्यात ३ लाख ४६ हजार ५३ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात सोयाबीन २ लाख ५७ हजार ४२९ हेक्टर, कपाशी ३२ हजार १५९ हेक्टर, तूर ३८ हजार ४१८ हेक्टर या पिकांचा समावेश आहे. एकूण ३ लाख ८० हजार ५०५ शेतकऱ्यांनी २ लाख २२ हजार ८५१ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.

त्यात सोयाबीनसाठी २ लाख ४६ हजार ४६४ शेतकऱ्यांनी १ लाख ८६ हजार ७४४ हेक्टर, कपाशीसाठी २० हजार ७६६ शेतकऱ्यांनी ६ हजार ७२० हेक्टर, तुरीसाठी ५२ हजार ६०४ शेतकऱ्यांनी १५ हजार १८२ हेक्टरसाठी विमा संरक्षण घेतले आहे.

माझे ७ एकरांपैकी ५ एकरांवरील सोयाबीन पावसात भिजले आहे. माल डागील झाला आहे. काल दुपारनंतरच्या वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे २ एकरावंरील कपाशीचे पीक आडवे झाले. ऊसही आडवा पडला. हळदीचे नुकसान झाले. सरकारने आर्थिक मदत व विमाभरपाई द्यावी.
शिवाजी इंगोले, कुरुंदा, जि. हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT