Government Aid
Government Aid Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : कळंब तालुक्यात ४८ गावांत मदतवाटप रखडले

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : अतिवृष्टिग्रस्त (Wet Drought) शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने (Shetkari Sangharsh Samite) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कळंब व राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे (Amol Yedge) यांच्या आश्‍वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीचे नेते प्रवीण देशमुख (Praveen Deshmukh) यांनी दिली.

यंदा पावसाने कधी नव्हे, इतकी शेतकऱ्यांची पाठ धरल्यामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. राज्य शासनाने नुकसानभरपाई जाहीर केली. मात्र अजूनही ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. आधीच तुटपुंजी मदत देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीचा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याला निधीही आला. मात्र ग्रामसेवकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

ऐनदिवाळीच्या तोंडावर निधी वाटप न झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. तलाठी व कृषी सहायक यांच्याकडे असलेल्या गावांतील निधीवाटपाची प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे. ग्रामसेवकांकडे असणाऱ्या गावांतील शेतकरी मात्र मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. याच मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पाचांळ यांची भेट घेतली. दोन्ही अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

त्यामुळे संघर्ष समितीने आंदोलन स्थगित केले आहे. शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. या वेळी मुंबई बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख, पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, दत्तकुमार दरणे, प्रा. घनशाम दरणे, अशोक बोबडे, अरुण राऊत, दिनेश गोगरकर, राहुल कदम, मंगेश दरणे, संदीप गजबे, इंदू नाईक, व्दारका थूल, शेवंता सोनवणे, मंगेश हाते, देवेंद्र वानखडे, दिनेश मांढरे यांच्यासह कळंब व राळेगाव तालुक्यांतील शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

Government Contractor Movement : सर्व विभागांतील कंत्राटदारांचे ७ मेपासून काम बंद आंदोलन

Loksabha Election : निवडणुकीच्या पाहणीसाठी २३ देशांचे ७५ अभ्यासक दाखल

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT