sugar mill
sugar mill Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Mill : साखर कारखान्यांपुढे ऊस गाळपाचे संकट

टीम ॲग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात ऊसतोडणी (Sangli Sugar Harvesting) मजूर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी ऊसतोडणी मजूर (Labor) आले आहेत. त्यामुळे साखर कारखाने (Sugar Mill) सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. परतीच्या पावसामुळे (Heavy Rainfall) ऊस शेतात पाणी साचून राहिल्याने ऊसतोड करणे मुश्कील बनत आहे.

आठवडाभर ऊसतोडणी करणे शक्य नसल्याने साखर कारखान्यांपुढे गाळपाचे संकट उभारले आहे. साखर कारखाने १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गव्हाणीत मोळी टाकण्याचे कार्यक्रम हाती घेतले. त्यानंतर साखर कारखाना सुरू करण्याच्या उद्देशाने ऊस तोडणीचे नियोजन केले. जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कर्नाटक या ठिकाणांहून ऊस तोडणी मजूर दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली. शेतात पाणी साचले गेल्या तीन दिवसांपूर्वी पावसाने उघडीप दिली होती. परंतु त्यानंतर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे आणखी संकट निर्माण झाले.

दरम्यान, साखर कारखान्यांनी ऊस तोडणीचे केलेले कार्यक्रम विस्कटले आहेत. गेली दोन आठवडे पावसाने कहर केल्याने उसात पाणी साचल्याने गाळप हंगामाला विलंब लागणार आहे. जिल्ह्यातील गतवर्षी चार साखर कारखाने बंद होते. त्यामुळे त्या साखर कारखान्याच्या लाभ क्षेत्रातील ऊस तोडणीवर त्याचा फटका बसला होता.

शेतकऱ्यांना पैसे देऊन तोडी घ्याव्या लागल्या होत्या. त्यातही गतवर्षी परतीच्या पावसाचा फटकाही काही प्रमाणात बसला होता. या साऱ्यामुळे यंदा जिल्ह्यातील सर्वच कारखाने सुरू करण्याच्या हेतून हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु सर्व कारखाने सुरू होणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT