Credit Society Agrowon
ताज्या बातम्या

Credit society : प्रस्तावित कारवाईवर सोसायट्यांचा आक्षेप

Cooperative Department : काही विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांवर अवसायनाची कारवाई सुरू झाली असून धाराशिव जिल्हा उपनिबंधकांनी त्यावर खुलासा केला आहे.

Team Agrowon

Dharashiv News : काही विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांवर अवसायनाची कारवाई सुरू झाली असून जिल्हा उपनिबंधकांनी त्यावर खुलासा केला आहे. पुन्हा एकदा लेखापरीक्षण करावे असा खुलाशात म्हटले आहे. काही संस्थानी जिल्हा बँकेकडे बोट दाखविले असून त्यांनी दाखविलेली तफावत चुकीची असल्याने आता त्याची खातरजमा करण्यात येणार आहे.  

जिल्हा बँकेकडून येणे-देणे व्यवहारामधील अनिष्ट तफावत बँकाकडून सहकार विभागाला दिली आहे. त्यानुसार ६० टक्क्याहून अधिक तफावतीच्या संस्थांवर अवसायनाची कारवाई अपेक्षित आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून १९८ संस्थांना अंतरिम नोटीस देऊन म्हणणे मांडण्यासाठी कालावधी दिला. संस्थांनी म्हणणे सादर करत बँकेने काढलेली तफावत गृहित धरू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. संस्थेची एवढी तफावत नसल्याचे सांगण्यात येत असून जिल्हा उपनिबंधक यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. जिल्हा बँकेने काढलेल्या तफावतीवरच संस्थानी आक्षेप घेतल्याने लेखापरिक्षकांकडून तपासणी करणे आवश्यक आहे. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी नेमकी कोणाची बाजू खरी व कोण खोट सांगत आहे याची खातरजमा करावी लागणार आहे.

सेवा संस्था, जिल्हा बँक व्यवहारात अनेकदा गैरव्यवहार व अनियमितता झाली उघड आहे. प्रत्येकवेळी सेवा संस्थाच कशी जबाबदार असेल बँकेचाही हेतू तपासणे आवश्यक आहे. संस्थांच्या अंगाशी आल्यानंतर थेटपणे जिल्हा बँकेवर आक्षेप घेतला असून काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्हा बँकेची स्थिती पाहता संस्था व्यवहारामध्ये पारदर्शकता न पाळल्यानेच स्थिती झाल्याची बाजू कायमपणे समोर आली आहे. संस्था जेवढी जबाबदार तेवढाच बँकेचा कारभारसुद्धा जबाबदार असल्याचे संस्थांच्या प्रतिनिधीचे म्हणणे येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT