Nashik News  Agrowon
ताज्या बातम्या

Grape Traders : द्राक्ष व्यापाऱ्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

Nashik Grape Farming : पोलिसांनी ठरवले तर आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन देखील ते न्याय देऊ शकतात. निफाड तालुक्यातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना ओझर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्यामुळे मोठा दिलासा मिळाला.

Team Agrowon

Nashik News : पोलिसांनी ठरवले तर आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन देखील ते न्याय देऊ शकतात. निफाड तालुक्यातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना ओझर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्यामुळे मोठा दिलासा मिळाला. तिवारी यांनी भक्कम कायदेशीर बाजू मांडल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी चार द्राक्ष व्यापाऱ्यांचा जामीन निफाड न्यायालयाने फेटाळला.

सुकेणा येथील शेतकरी योगेश परशुराम भंडारे यांच्यासह निफाड तालुक्यातील सावरगाव, कुंभारी, पंचकेश्वर, पालखेड, वनसगाव, नांदुर्डी, कळवण तालुक्यातील अभोणा येथील ६० ते ७० शेतकऱ्यांसोबत संशयित आरोपी आलम अमीन बागवान (रा.बागवान गल्ली, चांदवड), वसीम ऊर्फ फिरोज युसूफ शेख (रा. उगाव, ता. निफाड), कलीम बागवान (रा. गांधीनगर, कोपरगाव), बबलू शेख (रा. उगाव, ता. निफाड) यांनी शेतीमालाचा व्यवहार केला.

काही शेतकऱ्यांना रोख रक्कम व काही ‘फोन पे’वरून पैसे देत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. उर्वरित रक्कमेचा एचडीएफसी बँकेचा धनादेश दिला. संबंधित धनादेश पुरेशा रक्कमेअभावी वटले नाहीत. त्यानंतर शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे पैशासाठी तगादा लावला. मात्र,व्यापारी फोन बंद करून फरार झाले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेत त्यांना माहिती दिली. यात १ कोटी ३६ लाख ७८ हजार ५८० रुपयांची फसवणूक झाली. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार या व्यापाऱ्यांविरोधात ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याची सुनावणी निफाड न्यायालयासमोर झाली. त्या वेळेस पोलिस निरीक्षक तिवारी यांनी पोलिसांची कायदेशीर बाजू मांडत आरोपींच्या जामीन अर्जावर हरकत घेतल्याने निफाड न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव

संशयित आरोपींनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. उच्च न्यायालयात देखील आम्ही शेतकऱ्यांची प्रभावी बाजू मांडणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले. याबाबत शेतकऱ्यांनी तिवारी यांचे आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT