Cotton Production Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Production : कापसाचे उत्पादन वाणावर नव्हे, तर व्यवस्थापनावर अवलंबून

Cotton Management : कापसाचे उत्पादन वाणावर नव्हे तर व्यवस्थापनावर अवलंबून असल्याचे मत छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख तथा सहयोगी संचालक संशोधन व विस्तार कृषी विद्यापीठ डॉ. सूर्यकांत पवार यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Jalna News : कापसाचे उत्पादन वाणावर नव्हे तर व्यवस्थापनावर अवलंबून असल्याचे मत छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख तथा सहयोगी संचालक संशोधन व विस्तार कृषी विद्यापीठ डॉ. सूर्यकांत पवार यांनी व्यक्त केले.

अॅग्रो इंडिया गटशेती संघाचा २२१० वा द्वादश कार्यक्रम शुक्रवारी (ता. १७) गाडेगव्हाण (ता. जाफराबाद) येथे पार पडला. या कार्यक्रमात कापूस, सोयाबीन तसेच फळबाग लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहयोगी संचालक संशोधन तथा विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. पवार बोलत होते. या वेळी गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे, नुजिविडू सीड्स कापूस पैदासकार डॉ. एस. एस. माने, कृषी महाविद्यालय दहेगावचे प्राचार्य एस. एस. बैनाडे, गहू पैदासकार प्रा. सय्यद मुझफ्फर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला न्याहरी व शिवार फेरी देलेगव्हण (ता. भोकरदन) येथे पार पडली.

या वेळी डॉ. पवार व इतर तज्ज्ञांनी शेतकरी संतोष बोर्डे यांच्या शेतात प्लॅस्टिक मल्चिंगवर कापूस पिकाची पाहणी केली. डॉ. पवार म्हणाले, की जमिनीच्या प्रकारानुसार वाणाची निवड करावी. एकाच वाणाचा आगहा धरू नये. कोरडवाहू कपाशीसाठी १५०-१६० दिवसाचे वाण निवडावे. बेसल डोसचा वापर करावा.

पेरणी योग्य म्हणजे ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय म्हणजे पुरेसा ओलवा झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला दिला. कपाशीच्या पिकासाठी ठिबकचा वापर करावा. सोयाबीनमध्ये घरचे बियाणे उगवण क्षमता व बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. सोयाबीन, तूर, बाजरी पिकाचा पीक पद्धतीत सामावेश करावा. बीबीएफ रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी करण्याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. बैनाडे व डॉ. माने यांनी कापूस पिकातील सघन लागवड विषयी मार्गदर्शन केले. डॉ. कापसे यांनी गटशेती व आंबा मोसंबी डाळिंब लागवडीविषयी मार्गदर्शन केले. त्यासाठी रोपांची निवड, अंतर खत व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानचा काटेकोर पणे वापर करावा. या वेळी करटूले लागवडविषयी भगवान बनकर यांनी महिती दिली. कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सिताफळाची आवक वाढली; आवळ्याला कमी उठाव, हिरवी मिरची नरमली, लिंबुचे दर टिकून, लसणाचे दर स्थिर

Leopard Attack : निमगावात बिबट्याचा घोड्याच्या शिंगरूवर हल्ला

Dam Water Discharge : वाघूर, गिरणातून विसर्ग

Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात १.३३ लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा

Rain Damage Jalgaon : पावसाने जळगाव जिल्ह्यात हानी

SCROLL FOR NEXT