Cotton  Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Procurement : अकोटमधील कापूस खरेदीच्या वादावर पडदा

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या ६ डिसेंबरपासून कापूस खरेदी बंद ठप्प पडलेली आहे. यावर जिल्हा उपनिबंधकांनी तोडगा काढला असून व्यापारी व प्रशासकांमधील वाद निपटल्याचे सांगितले जाते.

टीम ॲग्रोवन

अकोला ः अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Akot APMC) गेल्या ६ डिसेंबरपासून कापूस खरेदी (Cotton Procurement) बंद ठप्प पडलेली आहे. यावर जिल्हा उपनिबंधकांनी तोडगा काढला असून व्यापारी व प्रशासकांमधील वाद निपटल्याचे सांगितले जाते. यानंतर आता गुरुवार (ता.१५) पासून येथील कापूस खरेदी पूर्ववत जोमाने सुरू होईल, असे सांगितले जात आहे.

विक्रीसाठी आलेल्या कापसाची नोंद बाजार समितीच्या काटापट्टीवर करण्याच्या कारणाने बाजार समिती प्रशासक व व्यापाऱ्यांमध्ये मतभेद झाले होते. बाजार समिती काटापट्टीवर नोंद घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी हर्राशी सोडून खरेदी बंद केली. जवळपास आठ दिवस अकोट बाजारातील कापूस खरेदी ठप्प आहे.

या विषयाला धरून बाजार समिती प्रशासक तसेच व्यापाऱ्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या होत्या. दोन्ही बाजूंकडून प्रश्न मिटण्याची चिन्हे दिसत नव्हती. व्यापाऱ्यांनी मुख्य प्रशासकांवरच आरोप केले होते. दुसरीकडे बाजार समिती प्रशासकांनीही २० व्यापाऱ्यांचे खरेदी परवाने १५ दिवसांसाठी निलंबित करून आपल्या अधिकारांचा वापर कसा होऊ शकतो हे व्यापाऱ्यांना दाखवून दिले.

दिवसेंदिवस हा प्रकार चिघळत चालल्याने शेतकऱ्यांची गोची वाढली होती. बाजार समितीतील खरेदी बंद पडल्याने दुसरीकडे खेडोपाडी व्यापारी कापसाची कमी दराने कापसाची मागणी करू लागले होते. आठ हजारांपर्यंत दर खाली आणण्यात आला. अखेरीस यामध्ये जिल्हा उपनिबंधकांनी मध्यस्थी करीत कायदेशीर बाबीं तपासल्या. काटापट्टीवर हलका कापूस अशी नोंद करणे कायदेशीर योग्य नाही, हे स्पष्ट केले. इतर विषयांवरही सामंजस्याने तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले. अखेरीस या वादावर पडदा पडला असून आता गुरुवारपासून खरेदी सुरू होत आहे.

अकोट बाजार समितीत ठप्प असलेल्या कापूस खरेदीच्या मुद्द्यावर तोडगा काढला आहे. व्यापाऱ्यांचे निलंबन परत घेण्याबाबत निर्देश देण्यात आले. काटापट्टीवर हलका माल अशी नोंद करता येणार नाही, ही बाजार समितीची भूमिका कायदासुसंगत होती. अखेरीस शेतकरी हिताचा निर्णय घेत कापूस खरेदी सुरु केली जात आहे.
विनायक कहाळेकर, जिल्हा उपनिबंधक, अकोला
बाजार समितीला जिल्हा उपनिबंधक श्री. कहाळेकर यांनी भेट घेऊन बैठक घेतली व वादावर तोडगा काढण्यात आला. व्यापाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी पत्र दिले आहे. काटा पट्टीवर हलका माल असा उल्लेख केला जाणार नाही, हेही सर्वमान्य करण्यात आले.
गजानन पुंडकर, मुख्य प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: कोकणातील बागायतदारांची क्रूर थट्टा, राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणेवर टीका

Nashik ZP Budge: ‘झेडपी’च्या अर्थसंकल्पात कृषी, पशुसंवर्धनासाठी ७.१८ कोटी

Shade Net House: उन्हाळ्यामध्ये शेडनेट हाउसमधील व्यवस्थापन

Burhanpur Ankleshwar Highway: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेस गतीच नाही

Agrowon Podcast: कापसात काहिशी सुधारणा, कांदा भाव दबावातच, काकडीचा भाव टिकून, गव्हाची आवक वाढली, कैरीला उठाव

SCROLL FOR NEXT