Department Of Revenue Agrowon
ताज्या बातम्या

Talathi Bharati 2023 : साडेचार हजार तलाठी पदांसाठी कक्ष सुरू

Maharashtra Talathi Bharti Recruitment 2023 : राज्यातील तलाठी पदांच्या चार हजार ६४४ रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Team Agrowon

Maharashtra Talathi Bharti 2023 : राज्यातील तलाठी पदांच्या चार हजार ६४४ रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पुण्यातील जमाबंदी आयुक्त आणि संचालक कार्यालयात ‘तलाठी भरती कक्ष’ सुरू करण्यात आलेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील रिक्त पदांच्या सरळसेवा भरतीसाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख कार्यालयाकडून राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल.

महसूल व वन विभागाने ही पदभरती राबविण्यासाठी राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून अप्पर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख पुणे यांची नेमणूक केली आहे. त्यानुसार हा कक्ष सुरू केला आहे.

या कक्षामध्ये पद भरती प्रक्रिया राबविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या ४ मे २०२२ आणि २१ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयामधील तरतुदी व मार्गदर्शक सूचनानुसार नमूद कंपन्यांची व्यवहार्यता तपासून कंपनीची निवड करणे, एजन्सीने निवडलेले परीक्षा केंद्र क्षेत्रीय यंत्रणेमार्फत तपासणे, पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करणे, निवडलेल्या कंपनीसोबत पदभरती प्रक्रियेसंबंधित सामंजस्य करार करणे,

परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे आयोजन, परीक्षेचा निकाल, शिफारस झालेल्या व शिफारस न झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, पद भरतीसंबंधित उमेदवारांकडून आक्षेप व तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा तांत्रिक अडचणी उद्‍भवल्यास त्यासंबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करून अडचणींचे निराकरण करणे आदी प्रकारची कामे होतील.

सूचना संकेतस्थळावर उपलब्ध

तलाठी भरतीसाठी सामान्य नागरिकांसाठी व प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे राज्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT