Water  Agrowon
ताज्या बातम्या

Contaminated Water : सांगली जिल्ह्यातील सव्वाशे गावांत दूषित पाणीपुरवठा

ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असताना जिल्ह्यातील १२६ गावांमधील १३८ ठिकाणच्या पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहेत.

टीम ॲग्रोवन

सांगली ः ग्रामपंचायत निवडणुकीची (Garm Panchayat Election) धामधूम सुरू असताना जिल्ह्यातील १२६ गावांमधील १३८ ठिकाणच्या पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने या ग्रामपंचायतींना दूषित पाण्याबाबत (Contaminated Water) दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावाचे पाणी नमुने पुन्हा दूषित आल्यास ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

साथीच्या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी गावात शुद्ध पाणीपुरवठा होणे आवश्‍यक असते. त्यामुळे ठराविक काळानंतर प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने तपासले जातात. त्यासाठी गावातील काही ठिकाणचे पाणी तपासले जात आहे. त्यामध्ये कोणते आवश्‍यक घटक आहेत आणि कोणते धोकादायक घटक आहेत याची तपासणी केली जाते.

जिल्ह्यातील विविध गावांमधील एक हजार ७०८ पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. यापैकी १२६ गावांमधील पाण्याचे १३८ नमुने दूषित आढळून आले आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यातील सहा गावांमधील सात, जत तालुक्यातील अकरा गावांमधील बारा, कवठेमहांकाळ तालुक्यातील पाच गावांमधील पाच, मिरज तालुक्यातील सोनी, हरिपूर, दूधगाव, समडोळी, मालगाव, तुंग, मौजे डिग्रज या मोठ्या गावांसह १८ गावांमधील पाण्याचे १९ नमुने दूषित आले आहेत. पलूस तालुक्यातील सहा गावांमधील सहा नमुने.

ादूषित पाणी असलेली गावे अशी...

वाळवा तालुक्यातील वाळवा, येजूर, गोटखिंडी, शिगाव, कापूसखेड, नेर्ले, कामेरी, बावची, येडेनिपाणी, बागणी, कोरेगाव आदी २९ गावांमधील ३३ पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. शिराळा तालुक्यातील १८ गावांमधील २१, खानापूर तालुक्यातील ८ गावांमधील ९ आणि कडेगाव तालुक्यातील १४ गावांमधील १४ पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. या सर्व गावांमधील ग्रामसेवकांना दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement Scam: कांदा खरेदीतील आर्थिक गैरव्यवहारामुळे ‘नाफेड गो बॅक’

Pune ZP: जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Ranbhaji Takla Modak: रानभाजी ‘टाकळा’पासून मोदक निर्मिती

Crop Insurance: नवीन पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद अल्प

Ajit Pawar: चांगल्या अधिकाऱ्यांची प्रशासनात गरज: अजित पवार

SCROLL FOR NEXT