Contaminated Water
Contaminated Water Agrowon
ताज्या बातम्या

आंबेगावात ३१ जलस्रोतांतील पाणी दूषित

टीम ॲग्रोवन

मंचर, जि. पुणे ः आंबेगाव तालुक्यात एकूण ३१ जलस्रोतांतील (Water Resource) पिण्याचे पाणी दूषित (Contaminated Water) असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये तळेघर, अडिवरे, डिंभे, निरगुडसर, धामणी या गावांच्या कार्यक्षेत्रात वाड्यावस्त्या व अन्य गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये पाणी निर्जंतुकीकरणासाठी (Water Disinfection) जनजागृती व आवश्यक त्या उपाययोजना आरोग्य विभाग व ग्रामपंचायतींना करण्याविषयी सूचना दिल्या आहेत. या कामावर पंचायत समितीही लक्ष केंद्रित करणार आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी दिली.

पठारे म्हणाले, की गावपातळीवर आरोग्य कर्मचारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडील जलरक्षक यांनी २५० जलस्रोतांचे पाण्याचे नमुने संकलित केले होते. राज्य प्रयोगशाळेत पाणी नमुने तपासणी केली. एप्रिल महिन्यातील तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. अजून मे महिन्यातील तपासणी अहवाल प्राप्त झाला नाही.

दूषित पाणी ठिकाणे गावठाण : जांभोरी, फलोदे, कुशिरे बुद्रुक, दिग्गद, तिरपाड, मेंगडेवाडी, शिंगवे, नागापुर, रांजणी, चांडोली बुद्रुक, एकलहरे, खडकी-पिंपळगाव, अवसरी बुद्रूक, शिरदाळे, देवगाव.

विहिरी, सार्वजनिक नळयोजना, बोअर वेल, सार्वजनिक टाकी ः नांदूरकीचीवाडी, नवबौद्धवस्ती, माचेचीवाडी, काळवाडी, तळेघर येथील खांडेवाडी आसाणेची जांभळेवाडी, आहुपेची जळकेवाडी, पिंपरगणेचे घोनमाळ, आमोंडीची शिवखंडी, भराडी जिल्हा परिषद शाळा, शिंदेवाडी, भगतमळा, एकतानगर, खडकी पुनर्वसन, दाभाडेवस्ती, माळवाडी.

ग्रामपंचायतींनी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी टीसीएल पावडरचा वापर करावा. नागरिकांनी पाणी उकळून घ्यावे. दूषित पाणीपुरवठा होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने सतर्क राहावे.

- डॉ. सुरेश ढेकळे, तालुका आरोग्य अधिकारी, आंबेगाव तालुका पंचायत समिती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

SCROLL FOR NEXT