Agrowon Exhibition Agrowon
ताज्या बातम्या

Agrowon Exhibition : महिला गटांच्या उत्पादनांना ग्राहकांची पसंती

औरंगाबाद शहरातील एमआयडीसी भागात कलाग्रामच्या मैदानावर ‘ॲग्रोवन’चे भव्य कृषी प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांतील महिला बचत गटांचे स्टॉल लागले आहेत.

Team Agrowon

औरंगाबाद : कृषी प्रदर्शनामध्ये शेतीविषक (Agrowon Exhibition) विविध माहिती आणि तंत्रज्ञानाच्या (Agriculture Technology) दालनांना पसंती मिळालीच, पण महिला बचत गटाच्या उत्पादनांनाही ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. अनेक बचत गटाच्या स्टॉलवर विशेषतः शहरी ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

औरंगाबाद शहरातील एमआयडीसी भागात कलाग्रामच्या मैदानावर ‘ॲग्रोवन’चे भव्य कृषी प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांतील महिला बचत गटांचे स्टॉल लागले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील बचत गटाच्या वनिता दंडे यांनी सर्वज्ञ हर्बल प्रोडक्टच्या नावाने विविध हर्बल औषधी वनस्पती स्टॉल लावला आहे.

यामध्ये अठरा प्रकारचे प्रॉडक्ट त्यांनी ठेवले आहेत. त्यामध्ये स्कीन, फूट केअर, फेस, बॉडी क्लीनर, ॲसिडिटी, पेन किलर, वांग क्रीम मुरूम आदी विकारावर हर्बल प्रॉडक्ट त्यांनी प्रदर्शनामध्ये आणली आहेत.

या त्यांच्या स्टॉलला अनेक महिला शेतकरी प्रतिसाद देत आहेत. यासोबतच पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथून अलका दिनकर वामन यांच्या संस्कार महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या आवळ्या प्रक्रिया उद्योगाच्या विविध विक्री स्टॉल आला आहे.

या मध्ये आवळा कॅन्डी, आवळा मावा, आवळा ज्यूस ही उत्पादने आणली आहेत. यातील आवळा कॅन्डी ही मधापासून बनवल्यामुळे या स्टॉलला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. जयपूर तालुका पैठण येथील श्री शाकंभरी महिला शेतकरी बचत गटाने लाल अंबाडीचे सरबत व सिरप असे नावीन्यपूर्ण उत्पादन आणले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील मुकुंदवाडी येथील सिद्धी महिला बचत गटाच्या महिलांनी हळद, आवळा कॅन्डी, आवळा सुपारी, आवळा ज्यूस, आवळा पावडर आदी प्रकारची उत्पादने प्रदर्शनामध्ये मांडली आहेत, यालाही ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या सोबतच औरंगाबादेतील साई सहयोग महिला बचत गट, जळगावच्या साई समर्थ महिला बचत गटाने नागली उडीद, मुगाची उत्पादने स्टॉलमध्ये मांडली आहेत. या सर्व उत्पादनांना ग्रामीण भागातील आलेल्या शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलाच, पण शहरी ग्राहकांनी विशेष पसंती दाखवली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : सोलापूरमध्ये कांदा टर्मिनल उभारा; कांदा धोरण समितीची राज्य सरकारला शिफारस

Sugarcane Rat: ‘सहकार शिरोमणी’ देणार जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदर

Konkan Produce: कोकणच्या शेतीमालाचा वसईकरांना गोडवा

Maharashtra Politics: भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वरुन शिवसेनेत प्रचंड नाराजी, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, काय निर्णय घेणार?

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; उडीद दबावातच, कांदा दर स्थिर, काकडीला किंमतीत वाढ तर हरभऱ्याला दर कमीच

SCROLL FOR NEXT