MLA Election Agrowon
ताज्या बातम्या

Karnataka Election Result 2023 : सीमाभागात काँग्रेसची मुसंडी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार पिछाडीवर

karnataka election results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. २२४ जागांसाठी ही मतमोजणी होत आहे. अनेक ठिकाणी काॅंग्रेसने मुसंडी मारली आहे. तर भाजपचे अनेक मंत्री बिछाडीवर आहेत.

Team Agrowon

Karnataka Election Result 2023 LIVE : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आज सकाळपासून मतमोजणी सुरू झाली आहे. निकालाबाबत सर्वांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) यांच्यात चुरशीची लढत झाली. निवडणुकीच्या सकाळच्या कलानुसार काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तर भाजपचे दिग्गज उमेदवार पिछाडीवर आहेत.

विधानसभेच्या २२४ जागांमध्ये सुरु असलेल्या मतमोजणीमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस ११८, भाजपचे ७१, जेडीएसचे २८ उमेदवार आघाडीवर आहेत.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री भाजप नेते बसवराज बोम्मई, काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार आणि जेडीएसचे एचडी कुमारस्वामी यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सीमाभागामध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या हाती निराश झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये समितीचे सर्व उमेदवार पिछाडीवर आहेत. तर बेळगाव जिल्ह्यातील 18 मधील 13 मतदारसंघावर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या काॅंग्रेससाठी आनंदाची बातमी आहे. निपाणी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे उत्तम पाटील सध्या आघाडीवर आहेत.

हुबळीतून सहा वेळा आमदार राहिलेले माजी उपमुख्यमंत्री भाजपचे निष्ठावंत म्हणून ओखळले जाणारे जगदीश शेट्टर यांनी यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांचा मुकाबला भाजपचे उमेदवार महेश तेंगीनाकई यांच्याशी आहे. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. कनकापुरा मतदारसंघात कर्नाटकचे मंत्री आर अशोक आणि काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात निवडणूक लढत आहे. या मतदारसंंघात डी के शिवकुमार आघाडीवर आहेत. कर्नाटकातील वरुणा विधानसभा जागा चर्चेत आहे. या जागेवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या निवडणूक लढवत आहेत.

शिकारीपुरा मतदारसंघातून काँग्रेसचे जीबी मलतेश हे उमेदवार आहेत. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय विजयेंद्र यांच्यामुळे ही जागा चर्चेत आहे. भाजपने यावेळी विजयेंद्र यांच्यावर बाजी मारली आहे. तर चन्नापटना या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि भाजपचे उमेदवार सीपी योगेश्वर यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात कुमारस्वामी बिघाडीवर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज; सोमवारपासून विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Jowar Procurement : अमरावतीत ज्वारीची खरेदी होणार

Non Cognizable Offence: आमदार संजय गायकवाड यांच्यावर मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल

Crop Insurance Payout : पंचाहत्तर हजार शेतकऱ्यांना ५५ कोटींचे पीकविमा भरपाई

POCRA Scam : पोकरातील गैरप्रकारप्रकरणी अहवालानंतर कारवाई

SCROLL FOR NEXT