Voter List
Voter ListAgrowon

Karnataka Election Vote 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान

Karnataka Election : विजयपुर जिल्ह्यातील बासवाना बागेवाडी तालुक्यात काही व्यक्तींनी ईव्हिएम आणि व्हिव्हिपीएटी मशिन तोडल्याची घटना घडली.

Karnataka Vote : कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी १० मे रोजी मतदान सुरू आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली.

संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांशी वाद घातल्यामुळे कर्नाटकमधील विविध भागात २३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.  

कर्नाटकमध्ये २२४ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी २ हजार ६१४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कर्नाटकमध्ये ६५.६९ टक्के मतदान झाल्याचं पीटीआयनं सांगितलं. ६ वाजता मतदान पूर्ण होईल. 

Voter List
Karnataka Election 2023 : कर्नाटकात 224 जागांसाठी मतदान सुरू

दुपारी एक वाजेपर्यंत ३७.२५ टक्के मतदारांनी हक्क बजावला होता. माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी मतदान होलेनारसीपुरा, हसन मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

तसेच कर्नाटक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्षडी के शिवकुमार यांनीही रिक्षा चालवल रामनगर मतदान केंद्रावर एंट्री केली. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मतदानाला उपस्थित राहून मतदान केले. तसेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री भाजपचे नेते बी एस येदियुरप्पा यांनी देखील सहकुटुंब मतदान केले. 

मतदानाच्या दरम्यान संध्याकाळी काही भागात हिंसक घटना झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.

विजयपुर जिल्ह्यातील बासवाना बागेवाडी तालुक्यात काही व्यक्तींनी ईव्हिएम आणि व्हिव्हिपीएटी मशिन तोडल्याची घटना घडली. तसेच पोलिसांच्या गाड्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. 

दरम्यान, भाजप, कॉँग्रेस आणि जनता दल सेक्युलरमध्ये चुरशीची लढाई या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. कर्नाटक विधानसभेचा निकाल १३ मे रोजी लागणार आहे.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com