Congress Protest
Congress Protest Agrowon
ताज्या बातम्या

Electricity Rate Hike : वीज दरवाढीविरोधात पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

Team Agrowon

Pune News : आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच महावितरणसह (Mahavitaran) खासगी वीज कंपन्यांच्य वीज दरात (Electricity Rate Hike) वाढ झाली आहे. आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सामान्यांना वीज दरवाढीमुळे झटका दिला आहे.

वीज दरवाढीच्या निर्णयाविरोधात आक्रमक होत काँग्रेसने पुण्यात आंदोलन (Congress Protest On Electricity Rate Hike) सुरू केले आहे. महावितरणच्या कार्यालयाबाहेर राज्य सरकारविरोधात काँग्रेस कार्यकर्ते जोरदार करत आहेत.

राज्या वीज नियामक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यात १ एप्रिलपासून वीजेच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एकीकडे महागाई वाढत असतानाच वीजेचे दर वाढल्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. या वीज दरवाढीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने रास्ता पेठेतील महावितरणच्या कार्यालायाबाहेर आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनात कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग पाहायला मिळत आहे. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वीजदरवाढीमुळे यावर्षी १० टक्के, पुढच्या वर्षी १७ टक्के याशिवाय बीपीएल ग्राहकांसाठी ७ टक्के अशी दरवाढ करण्यात आली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली वीज दरवाढ गृहिणींचे तसेच सामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे, आणि म्हणूनच या मिंधे सरकारला ही दरवाढ मागे घ्यायला लागेल, असा घणाघात पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे.

दोन महिन्यांपूर्वी ही कंपनी अदानीला देण्याचा घाट घालण्यात आला होता. त्याविरोधात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी महाराष्ट्रभरात आंदोलन करत होते. या वीज दरवाढीचा अदानीला देण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही शिंदे यांनी यावेळी केला.

वीजदरवाढीचा सर्वाधिक फटका हा सामान्यांना फटका बसत आहे. दिवसेंदिवस गॅसचे दर वाढत आहेत. त्याचप्रमाणे आता वीजेचीही दरवाढ होत आहे. त्यामुळे आता सरकारने याचा विचार करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT