Ashok Chavan Agrowon
ताज्या बातम्या

Ashok Chavan : अशोक चव्हाण पोचले थेट बांधावर

मुदखेड व अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यांसह गारपिटीने क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे. यात गहू, टरबूज, खरबूज, हरभरा, केळी आदी पिके पूर्णतः उध्वस्त झाली आहेत.

Team Agrowon

Nanded News : मुदखेड व अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यांसह गारपिटीने (Hailstorm) क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे. यात गहू, टरबूज, खरबूज, हरभरा, केळी आदी पिके पूर्णतः उध्वस्त झाली आहेत. या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर (Natural Calamity) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) तातडीने मुंबईहून थेट बांधावर पोहोचले व त्यांनी नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली.

आ. चव्हाण यांनी माजी आमदार अमरनाथ राजूरकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, कन्या श्रीजया चव्हाण, बाळासाहेब देशमुख यांच्यासह शुक्रवारी सकाळपासून अनेक नुकसानग्रस्त गावांमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

अस्मानी संकटाने निर्माण झालेली भयावह परिस्थिती अशोक चव्हाण यांच्याकडे विशद करताना अनेक शेतकऱ्यांचा बांध फुटला व त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

पीडितांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असून, नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असा शब्दही त्यांनी दिला. त्यांनी शेतकरी बालाजी काशिनाथ संगेवार यांच्या केळीच्या नुकसानग्रस्त बागेची पाहणी केली.

गारपिटीत उद्ध्वस्त झालेल्या पोलिस चौकीलाही त्यांनी भेट दिली. त्यांनी बारड, निवघा, डोंगरगाव, वासरी, शंखतीर्थ आदी भागातील शेतीची पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT