Salam Kisan Agrowon
ताज्या बातम्या

Salam Kisan: `सलाम किसान`कडून माती परीक्षण व ड्रोन फवारणी प्रात्यक्षिकाचे आयोजन

सलाम किसान (मुंबई) समूहाने शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरविण्यासाठी अभियान सुरू केले आहे.

Team Agrowon

सलाम किसान (मुंबई) समूहाने (Salam Kisan) शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर (Modern Agriculture Technology) आधारित सेवा पुरविण्यासाठी अभियान सुरू केले आहे.

भिसी विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि सलाम किसान यांच्या तर्फे संयुक्तपणे भिसी (ता. चिमूर, जि. चंद्रपूर) येथे प्रथमच मोफत माती परीक्षण (Soil Test) व ड्रोन फवारणी (Drone Spraying) चे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रात्यक्षिक शुक्रवारी (ता. १०) ए. एन. लॉन या ठिकाणी होणार आहे.

भिसी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष अभय मुंगले, संस्थेचे व्यवस्थापक राजेश कामडी, संचालक नत्थुजी गेडाम, संस्थेचे डिजिटल मीडिया प्रमुख सुमित मुंगले यांच्याशी चर्चा करून `सलाम किसान`ने या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शेतकऱ्यांनी मातीचा नमुना घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे कळवण्यात आले आहे.

आयआयटी कानपुर या संस्थेने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या ९० सेकंदात मातीचे परीक्षण करण्यात येणार आहे.

अलीकडच्या काळात शेतीकामासाठी ड्रोनचा वापर वाढत आहे. शेतीमध्ये भूमीअभिलेखाच्या नोंदी, खते, किटकनाशक फवारणीसाठी ड्रोनच्या वापरला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

ड्रोनच्या माध्यमातून किटकनाशकांची फवारणी कशी करायची, याचेही प्रात्यक्षिक यावेळी दाखवले जाणार आहे.

‘सलाम किसान' हे एक सुपरॲप असून त्या माध्यमातून शेती मूल्यसाखळीतील सर्व घटकांना ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन' पुरवण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: नांदेडमध्ये निधीअभावी शेतकरी अपघातग्रस्तांचे ८७ वारस वाऱ्यावर

Leopard Terror: पर्यटन हंगामात बिबट्याचा गोंधळ

Mangrove Tree cutting: कांदळवन झाडांची कत्तल

Fertigation Technology: पिकांना अचूक पोषण देणारी फर्टिगेशन पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

Water Storage: सोलापूर जिल्ह्यात लघू, मध्यम प्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा

SCROLL FOR NEXT