Devendra Fadnavis Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : कृषिपंपाच्या जोडण्या तातडीने पूर्ण करा

Agriculture Pump Electricity : शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेत तातडीने सर्व वीजजोडण्या पूर्ण करण्याचे आदेश दिले.

Team Agrowon

Nagpur : शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेत तातडीने सर्व वीजजोडण्या पूर्ण करण्याचे आदेश दिले. याशिवाय सौरपंप योजनेसाठी जागरूकता निर्माण करण्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर तहसील कार्यालयात शुक्रवारी ( ता. १९) कळमेश्वर आणि सावनेर तालुक्याची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी जिल्हाभर सुरू असलेल्या बैठकांची भूमिका मांडली. शासकीय योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचाव्या यासाठी नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये आढावा बैठक घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन दिवसांमध्ये एकूण चार मतदारसंघांमध्ये आढावा बैठका घेतल्या जातील. शासनाच्या प्रत्येक योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचतात अथवा नाही हे प्रत्यक्ष जाऊन पाहणे लोकप्रतिनिधींचे कार्य असून त्यासाठी आढावा बैठकांच्या आयोजन करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले..

महाराष्ट्रात सन २०१८-१९मध्ये जलसाठे वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत दोन्ही तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. अभियानांतर्गत स्थानिक स्वयंसेवी संस्था व लोकसहभागाची माहिती जाणून घेतली.

प्रधानमंत्री आवास योजना, भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबतची सद्यःस्थिती, स्वच्छ भारत अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसामुंडा कृषी क्रांती योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत नवीन विहिरींचे वाटप याचा आढावा घेतला.

आढावा बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुनील केदार, चंद्रशेखर बावनकुळे, टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत, महिला बालकल्याण समिती अध्यक्ष अवंतिका लेकुरवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व उपविभागीय स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी इंडो इस्राईल प्रकल्पांतर्गत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्याच्या तेलगाव येथील ऊर्मिला राऊत यांना आणि कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील अजनी येथील रामदास उमाटे यांना त्यांच्या हस्ते ट्रॅक्टर वितरीत करण्यात आले. बैठकीचे सादरीकरण उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT