Chhagan Bhujbal Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

निफाड तालुक्यात अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे कांद्याची रोपे सडली. विशेषतः मक्याच्या पिकासह इतर सर्व पिके भूईसपाट झाली आहेत.

टीम ॲग्रोवन

नाशिक : निफाड तालुक्यात अतिवृष्टी (Nashik Heavy Rain) आणि संततधार पावसामुळे कांद्याची रोपे सडली. (Onion Seedling Damage) विशेषतः मक्याच्या पिकासह इतर सर्व पिके भूईसपाट (Crop Damage) झाली आहेत. सोयाबीन आणि उसाचेही नुकसान (Soybean Crop Damage) झाले. टोमॅटोसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून उभे केलेले मंडप कोसळून नुकसान झाले. पाणी आणि चिखलामुळे पिके सडली आहेत.

शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने या वर्षी दुसरे एक संकट निर्माण झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा; एकही शेतकऱ्याचा पंचनामा बाकी राहता कामा नये, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या.

निफाड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत रविवार (ता. १८) रोजी निफाड शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक पार पडली. या वेळी आमदार दिलीपराव बनकर, उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गणेश चौधरी यांच्यासह, राजेंद्र डोखळे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार आदीं नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

गोदावरी कालव्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी गेलेल्या ठिकाणचेसुद्धा पंचनामे करून शासनाला तातडीने प्रस्ताव पाठवावे. एकाही शेतकऱ्यावर अन्याय्य झाला तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. खेडलेझुंगे, धरणगाववीर, डोंगरगाव, नांदगाव, गाजरवाडी, धरणगाव खडक, सारोळे व्यतिरिक्त ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या पिकांचे पंचनामे करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.

कामात दिरंगाई आणि टाळाटाळ खपवून घेणार नाही

राज्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता व जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याशी चर्चा करून शासनाच्या नियमावलीत बदल करण्याच्या सूचना भुजबळ यांनी केल्या. त्याप्रमाणे ६५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस असलेल्या मात्र संततधार पाऊस असल्याने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे प्रस्ताव सादर करण्यात यावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच या कामात दिरंगाई आणि टाळाटाळ खपवून घेणार नाही, अशा इशारा भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ

Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार

Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद

Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

SCROLL FOR NEXT