Farmer Loan Waive Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Loan Waive : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी

Loan Waiver Scheme : राज्यामध्ये अतिशय कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा जास्त घटणार आहे. शेतकऱ्यांनी पेरणी-खतासाठी, बियाण्यांसाठी बँकेकडून कर्ज घेऊन शेतीसाठी खर्च केलेला आहे.

Team Agrowon

Karad News : राज्यामध्ये अतिशय कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा जास्त घटणार आहे. शेतकऱ्यांनी पेरणी-खतासाठी, बियाण्यांसाठी बँकेकडून कर्ज घेऊन शेतीसाठी खर्च केलेला आहे.

परंतु दुष्काळामुळे शेतकऱ्याला कर्ज फेडणे शक्य होणार नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे पीककर्ज, शेतीपंपाची वीजबिले, शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी १०० टक्के माफ करावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी कऱ्हाडचे (जि. सातारा) तहसीलदार विजय पवार यांना निवेदन देऊन केली.

तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी चंद्रकांत यादव, सुनील कोळी, पोपट जाधव, अविनाश फुके, गणेश शेवाळे, आकाश रेठरेकर आदींसह शेतकऱ्यांनी निवेदन दिले. निवेदनातील माहिती अशी, की राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडण्याची शक्यता दिसत आहे.

यासाठी सरकारने तातडीची बैठक घेऊन दुष्काळ निवारणासाठी उपाय योजना राबविणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पेरणी-खतासाठी, बियाण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊन शेतीसाठी खर्च केलेला आहे.

शेतकऱ्यांचे पीककर्ज, शेतीपंपाची वीजबिले, शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी १०० टक्के माफ करावी. यंदाच्या वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये. सरकारने साखरेचे निर्यात बंदी उठवावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Banks: गरिबांना अखेर वाली तो कोण?

Bogus Agriculture Inputs: बनावटगिरीला हवा कायद्याचा धाक

Agriculture Support: भीज पावसामुळे ऊस, तरकारी पिकांना नवसंजीवनी

Cotton Production Research: यांत्रिकीकरण, स्वच्छ कापूस उत्पादनावर संशोधन

User Charges: ‘यूझर चार्जेस’ला व्यापाऱ्यांचा विरोध

SCROLL FOR NEXT