जळगाव : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आयोगाला (National Food Security Commission) उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने उत्पादनात वाढ, दर्जेदार उत्पन्न मिळविणे यासाठी शेतीला अखंडित वीज पुरवठा (Power Supply) करावा व पुढे शेतकऱ्यांची थेट कोणतीही वीज बंद (Power Cut) करू नये, तोडू नये. यासाठी राज्य सुरक्षा आयोगाने आदेश पारीत केले.
या आदेशात आयोगाने शासनाला देखील सूचना केली की, शेतीला जास्तीत जास्त शेती उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी अखंडित वीज पुरवठा पुरविण्यासाठी योग्य त्या उपाय योजना कराव्यात, हा आदेश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे, आयोगाच्या सदस्य प्रिती कृष्णा बेतुले व आयोगाचे सचिव प. फ. गांगवे यांनी पारीत केले असल्याची माहिती लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे यांनी व वरिष्ठ विधीज्ञ अजय तल्हार यांनी गुरुवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयामुळे राज्यातील एक लाख शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे.
महाराष्ट्र राज्य अन्न आयोग यांच्याकडे सचिन धांडे यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, महावितरण कंपनी (महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, मुंबई) यांच्याविरुद्ध २०२२ होती. या तक्रारीत कृषी ग्राहकांनी अर्थात केल्यामुळे पुरवठा खंडित केलेल्या कारवाईवर आक्षेप घेतला होता.
२००८ मध्ये कर्की (ता. मुक्ताईनगर) येथील प्रकाश महाजन व रमेश महाजन यांनी शेतकरी हितसंबंधात या विषयाची तक्रार करून सुरुवात केली होती. शरद जोशी मंच, भारतीय किसान संघ यांनीही शेतकऱ्यांच्या या ज्वलंत विषयाचा पाठपुरावा करून न्यायासाठी दाद मागितली होती. त्यानंतर लोकसंघर्ष मोर्चाचे धांडे यांनी २८ ऑक्टोबर २०१०, २९ ऑक्टोबर २०१० महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे या बाबत तक्रार दाखल केली होती.
त्या अर्जावर आधारित महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने २ नोव्हेंबर २०१० ला कळविले की, वरिष्ठ कार्यालयाचा खुलासा आपणास कळवू’, मात्र गेल्या १२ वर्षांत कोणताही खुलासा किंवा पत्र देण्याची किंवा निर्णय घेण्याची साधी तसदीसुद्धा महावितरणने घेतली नाही. नोव्हेंबर २०१०, डिसेंबर २०१०, मार्च २०११ यामध्ये शासनाला शेकडो शेतकऱ्यांनी दाखल केलेली तक्रार व याचिका यावर मुंबई उच्च न्यायालयाने, वीज तोडण्यासाठी संबंधितांना पंधरा दिवस अगोदर पूर्व कल्पना देणे हे वीज कंपन्यांना बंधनकारक आहे असे म्हटले होते.
त्यानंतर धांडे यांनी २०११ पासून वीज कंपनीच्या मुजोरीचा पाठपुरावा केला होता. ११ मे २०११ रोजी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या, शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटणाऱ्या वीज कंपन्यांचे भांडेफोड सदर शेतकऱ्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याचप्रमाणे हा लढा कायम ठेवत २२ नोव्हेंबर २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना या संदर्भात परिपूर्ण माहितीचे निवदेन दिले होते.
मात्र १४ वर्षांत कोणतीही दखल न घेतल्यामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य अन्न आयोगाकडे शेतकऱ्यांना अखेर दाद मागावी लागली. आणि शेतकरी हिताचा निर्णय घेत राज्य अन्न सुरक्षा आोगाने वीज कंपन्यांना शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये, असे आदेश दिले. तर राज्य शासनालाही शेतकऱ्यांच्या विद्यूत पुरवठा अखंडपणे सुरू ठेवावा याकडेही लक्ष वेधून सूचना केली. हजारो शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक आहे.
... तर आंदोलन उभारणार ः धांडे
धांडे यांनी सांगितले, की या निर्णयाच्या जनजागृतीसाठी राज्यभर जनसंवाद यात्रा काढण्यात येईल. शेतकऱ्यांना या निर्णयाची माहिती देण्यात येईल. तरीही वीज कंपन्यांनी वीज कनेक्शन कट करणे सुरूच ठेवले तर मोठे आंदोलन उभारले जाईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.