Silk Farming Agrowon
ताज्या बातम्या

Sericulture : रेशीम कोष दर्जा सुधार, विस्तारासाठी समिती

राज्यात रेशीम शेती अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचे निमित्त ठरली आहे. त्यामुळेच रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजनांबाबत एका राज्यस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर ः ‘‘राज्यात रेशीम शेती (Sericulture) अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचे निमित्त ठरली आहे. त्यामुळेच रेशीम शेतीला (Silk Farming) प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजनांबाबत एका राज्यस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीची पहिली बैठक लवकरच नियोजित आहे. त्यातील सूचनांच्या आधारे रेशीम शेतीचा विस्तार व दर्जेदार कोष निर्मितीचे धोरण ठरविण्यात येईल,’’ असे रेशीम संचलनालयाच्या सूत्रांनी सांगितले.

शासन आदेशानुसार पंधराव्या वित्त आयोगाच्या कालावधीत केंद्रीय क्षेत्र योजना ‘सिल्क समग्र-२’ च्या अंमलबजावणीस केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील रेशीम क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी संशोधन व विकास, क्षमता बांधणी व प्रशिक्षण, रेशीम कीटक बीज उत्पादन, बळकटीकरण, विपणन प्रणाली व गुणवत्ता प्रमाणन प्रणाली यासाठी योजना केंद्रीय रेशीम मंडळामार्फत राबविण्यात येईल.

समितीत अध्यक्ष हे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, वस्त्रोद्योग सचिव, तर सदस्य सचिव उपसचिव (तांत्रिक) असतील. सदस्यांमध्ये संचालक रेशीम संचालनालय नागपूर, वस्त्रोद्योग खात्याचे सहसचिव, केंद्रीय रेशीम मंडळ बंगळूरचे सदस्य सचिव, केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था (म्हैसूर) संचालक, मूलभूत टरस रेशीम कीट बीज संघटन (बिलासपूर), केंद्रीय रेशीम मंडळ बंगळूरचे नोडल अधिकारी, शास्त्रज्ञ, नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे उपसंचालक, सहाय्यक संचालक यांचा समावेश आहे.

समितीमध्ये अशासकीय सदस्यांचाही समावेश आहे. त्यामध्ये मे. दिशा सिल्क (जालना), मे. भंडारा सिल्क उद्योग भंडारा, सुनील गावडे (रेशीम शेतकरी, माणिकवाडा, ता. नेर, यवतमाळ), निखिल चौधरी (रेशीम शेतकरी, साखरवाडी, फलटण, सातारा), मंगेश जगन्नाथ कडवकर (चॉकी रिअरिंग सेंटर, तेरखेडा, वाशी, उस्मानाबाद) यांचा समावेश आहे.

राज्यात रेशीम शेतीला चालना तसेच कोष उत्पादनाचा दर्जा सुधार याविषयी सूचनांसाठी समितीचे गठण केले आहे. यामध्ये अधिकाऱ्यांसोबतच शेतकऱ्यांचाही समावेश अशासकीय सदस्य म्हणून केला आहे. समितीची एक बैठक येत्या आठवड्यात घेण्याचे नियोजन केले आहे.
महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम संचालनालय, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांत पीक नुकसानीचे पंचनामे सुरू; केंद्राचे पथक लवकरच महाराष्ट्रात : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Drought Affected Farmers: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या

Urea Treatment: वाळलेल्या पिकांपासून घरच्या घरी बनवा जनावरांसाठी पौष्टिक चारा

Drought Affected Farmers: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार

Rain Update: राज्यातील ५ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उन्हाचा चटका कायम

SCROLL FOR NEXT