Sangli Market Committee
Sangli Market Committee Agrowon
ताज्या बातम्या

Sangli Market Committee : सांगली बाजार समितीच्या चौकशीसाठी समिती

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ( Sangli Market Committee) नोकरभरती, पदोन्नती आणि कोल्ड स्टोअरेजच्या (Cold Storage) जागेवर बेकायदेशीर व्यापारी गाळे बांधल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आर्थिक व्यवहारासह पोटनियमबाह्य कामकाजाची चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली असून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिले आहेत.

बाजार समितीमध्ये नियमबाह्य कामे, नोकरभरती आणि पदोन्नतीमध्ये अनियमितता असल्याबाबतची तक्रार स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली होती. या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी केलेली नोकरभरती आणि पदोन्नतीमध्ये गैरप्रकार झाल्याचे म्हणणे आहे. याशिवाय फळ मार्केटमध्ये खुली जागा कोल्ड स्टोअरेजसाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. परंतु या जागेवर बेकायदेशीरपणे व्यापारी गाळे बांधण्यात आल्याची तक्रार आहे.

त्यानुसार बाजार समिती १ एप्रिल २०१८ ते दि. ३१ मार्च २०२० या मुदतीचे वैधानिक लेखापरीक्षण जिल्हा विशेष लेखापरीक्षक (वर्ग-१) सहकारी संस्था कोल्हापूरचे किरणसिंह पाटील यांनी केलेल्या लेखापरीक्षणात गंभीर बाबी आढळल्या. अहवालाच्या छाननीनंतर बाजार समितीत काही आर्थिक अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले. कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम ४० व त्याखालील नियम १९६७ मधील नियमानुसार चौकशी अधिकारी म्हणून जिल्हा विशेष लेखापरीक्षक (वर्ग-१) सहकारी संस्थेचे संजय पाटील, सहायक निबंधक अनुष्का देशमुख, विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी अधिकारी यांनी आवश्यक चौकशी करून चौकशी अहवाल आवश्यक पुराव्यासह एका महिन्यात सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT