Cold Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather Update : राज्यात थंडीची चाहूल

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात घट झाल्याने पहाटे गारठा वाढला असून, दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात (Temperature) चढ-उतार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात घट झाल्याने पहाटे गारठा (Cold Weather) वाढला असून, दुपारी उन्हाचा चटका (Heat) जाणवत आहे. शुक्रवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये औरंगाबाद येथे राज्यातील नीचांकी १३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

नैॡत्य बंगालच्या उपसागरात तमिळनाडूच्या उत्तर किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तर ईशान्येकडील वारे सक्रिय होण्याची शक्यता असल्याने आजपासून (ता. २९) दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या (ईशान्य मॉन्सून) पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्याच्या किमान तापमानात घट होत आहे. तर दिवसा असलेल्या स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने उन्हाचा चटका वाढून कमाल तापमानात वाढ झाली. रात्री अनेक ठिकाणी दव पडत असल्याचे पहावयास मिळत आहे. शुक्रवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण वगळता राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या खाली होते. तर कमाल तापमान २९ ते ३५ अंशांच्या आसपास होते.

शुक्रवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : ़पुणे २९.८ (१३.८), जळगाव ३३.८(१४.३), कोल्हापूर ३०.७ (१७.८), महाबळेश्वर २५.३(१३.६), नाशिक २९.७ (१५.३), सांगली ३१.४(१६.५), सातारा ३०.०(१४.८), सोलापूर ३२.१ (१७.१), सांताक्रूझ ३४.५(२१.८), डहाणू ३३.६ (२१.१), रत्नागिरी ३४.५ (२०.६), औरंगाबाद ३०.४ (१३.२), नांदेड ३१.२ (१६.८), उस्मानाबाद - (१४.१), परभणी ३०.९ (१५.०), अकोला ३३.४ (१८.१), अमरावती ३३.० (१५.३), ब्रह्मपुरी ३३.८ (१८.०), बुलडाणा ३०.२ (१६.२), चंद्रपूर ३१.४ (१७.८), गडचिरोली ३१.४(१६.४), गोंदिया ३१.०(१७.०), नागपूर ३२.० (१६.४), वर्धा ३०.४(१५.८), यवतमाळ - (१४.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT