Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात थंडी वाढण्याची शक्यता

उत्तरेकडील गार वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यातही थंडी वाढण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

पुणे : उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी (Cold) वाढू लागली आहे. बुधवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानमधील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तर धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे राज्यातील नीचांकी १२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील गार वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यातही थंडी वाढण्याची शक्यता आहे.

राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात सातत्याने चढ-उतार होत असल्याने पहाटे थंडी आणि दुपारी चटका ही स्थिती आहे. राज्यात बुधवारी किमान तापमान १२ ते २२ अंशांच्या दरम्यान होते. उत्तरेकडील थंड व कोरडे वारे महाराष्ट्राकडे येऊ लागल्याने राज्याच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यातही किमान तापमानात घट होऊन गारठा वाढण्याची शक्यता आहे.

किमान तापमान कमी होत असतानाच कमाल तापमान ३० ते ३५ अंशांच्या आसपास कायम आहे. सांताक्रुझ येथे कमाल ३५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १७) राज्यात आकाश निरभ्र राहून, कोरड्या हवामानासह, किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


कमी दाब क्षेत्राचे संकेत
बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात आज (ता. १७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. वायव्येकडे सरकणारी ही प्रणाली शनिवारपर्यंत (ता. १९) आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर, तसेच केरळ आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत.


बुधवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३१.७ (१४.३), जळगाव ३२.४ (१४.०), धुळे ३२.० (१२.०), कोल्हापूर ३२.१ (१९.२), महाबळेश्वर २६.३(१३.९), नाशिक ३१.१ (१४.४), निफाड ३१.१ (१३.२), सांगली ३२.६(१८.०), सातारा ३१.२(१५.५), सोलापूर ३३.२ (१५.८), सांताक्रूझ ३५.१(२१.४), डहाणू ३१.८ (१९.९), रत्नागिरी ३४.५ (२१.३), औरंगाबाद ३१.४ (१३.०), नांदेड ३२.६ (१५.०), परभणी ३२.२ (१४.१), अकोला ३२.४ (१५.४), अमरावती ३१.८ (१४.०), बुलडाणा ३०.० (१५.६), ब्रह्मपुरी - (१५.३), चंद्रपूर - (१५.२), गडचिरोली ३१.२(१३.२), गोंदिया २९.८(१२.५), नागपूर ३१.० (१३.८), वर्धा ३१.९ (१४.०), वाशीम ३२.५ (१६.८), यवतमाळ ३२.० (१२.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Summer Moong Sowing: खानदेशात उन्हाळ मूग पेरणीला प्रतिसाद

Sugar Export Ban: साखर निर्यात बंदी म्‍हणजे शेतकऱ्यांची लूट : अशोकराव थोरात

Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

SCROLL FOR NEXT