Cold Storage Agrowon
ताज्या बातम्या

Cold Storage : ‘कोल्ड स्टोअरेज, पॅकहाउस’उभारणी आणि व्यवसाय संधी

काढणीनंतर शेतीमालाची योग्य साठवणूक, पॅकिंग, शीतकरण, मार्केटपर्यंतची वाहतूक इ.साठी कोल्ड स्टोअरेज, पॅकहाउस तंत्रज्ञान फायदेशीर ठरत असल्याने याचा वापर अलीकडे फार वाढला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः काढणीनंतर शेतीमालाची योग्य साठवणूक (Post Harvest Storage), पॅकिंग, शीतकरण (Cold Storage), मार्केटपर्यंतची वाहतूक इ.साठी कोल्ड स्टोअरेज, पॅकहाउस तंत्रज्ञान फायदेशीर ठरत असल्याने याचा वापर अलीकडे फार वाढला आहे. कोल्ड स्टोअरेज, पॅकहाउस उभारून भाडेतत्त्वावर स्टार्टअप व्यवसाय करण्यासही भरपूर वाव आहे.

शासनाकडूनही यास प्रोत्साहन दिले जात आहे. अशा या फायदेशीर तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणारी दोनदिवसीय वीकएण्ड कार्यशाळा ता. २४ आणि २५ डिसेंबर रोजी ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे आयोजिली आहे.

यात कोल्ड स्टोअरेज-पॅक हाउस तंत्रज्ञानाची ओळख, उभारणी, डिझाइन्स, देखभाल व्यवस्थापन, भाडेतत्त्वावर व्यवसाय कसा करावा, व्यवसायाचे तांत्रिक विश्‍लेषण, कोल्डचेनमधील मूल्यवर्धन, जसे की फळे आणि भाज्या प्रक्रिया संधी, शासकीय योजना व अनुदान, बॅंक फायनान्स इ.विषयांवर या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. तसेच फिल्ड व्हिजिटमध्ये प्रत्यक्ष अद्ययावत कोल्ड स्टोअरेज पाहण्याची संधी आहे. प्रति व्यक्ती पाच हजार पाचशे रुपये शुल्क आहे. यात चहा, जेवण, प्रमाणपत्र, फिल्ड व्हिजिट इ.चा समावेश आहे. पूर्वनावनोंदणी आवश्यक. अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क ः ९१४६०३८०३१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT