Datta sugar
Datta sugar Agrowon
ताज्या बातम्या

Datta Sugar : ‘श्री दत्त’चा सहवीज प्रकल्प ठरला देशात सर्वोत्कृष्ट

Team Agrowon

Pune News : साखर उद्योगाधारित सहवीज निर्मितीत उत्कृष्ट काम करणाऱ्या २८ प्रकल्पांना ‘कोजन असोसिएशन ऑफ इंडिया’चे राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर झाले आहेत. देशातील प्रथम क्रमांकाच्या चार उत्कृष्ट सहवीज प्रकल्पांमध्ये यंदा कोल्हापूरच्या श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.

सहवीज प्रकल्पांसाठी होत असलेल्या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन याच दिवशी करण्यात आले आहे. पुण्यातील वाकड येथील हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनलमध्ये १६ सप्टेंबरला माजी केंद्रीय कृषिमंत्री व कोजन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष शरद पवार व असोसिएशनचे उपाध्यक्ष व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, तसेच केंद्र शासनाच्या नवीन व नूतनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव (बायोमास) डी. डी. जगदाळे, सहसचिव (हायड्रोजन व नियमन व्यवहार) अजय यादव यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

साखर कारखान्यांना सहविजेमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. या प्रकल्पांमुळे देशाला शुद्ध वीज व कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न, असा दुहेरी फायदा झाला आहे. त्यामुळेच या प्रकल्पांचा गौरव केला जात आहे. या वेळी ‘साखर कारखाना संकुलांकरिता हरित नूतनीकरणीय ऊर्जेचे एकात्मिक धोरण’ या विषयावर परिषददेखील होत आहे. त्यात जैवइंधन कार्यक्रम, जैववायू प्रकल्पांची शाश्‍वतता, एकात्मिक जैव रिफायनरी, सहवीज व हायड्रोजन निर्मितीमधील समन्वय अशा महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होईल.

कोजन असोसिएशनची स्थापना शरद पवार यांच्या पुढाकाराने २००१ मध्ये करण्यात आली. ते असोसिएशनचे तहहयात अध्यक्ष आहेत. साखर उद्योगातील विविध कामकाजांबाबत दरवर्षी पुरस्कार दिले जातात. मात्र सहवीज क्षेत्राचा त्यात समावेश नव्हता. त्यामुळे २०२२ पासून सहवीज प्रकल्पांसाठी स्वतंत्र पुरस्कार देण्याचा निर्णय श्री. पवार यांनी घेतला.

बॉयलर क्षमता ८७ किलोग्रॅम प्रतिसेंटिमीटर वर्गपेक्षा कमी असलेले आणि जादा असलेले खासगी आणि सहकारी सहवीजनिर्मिती प्रकल्पांना तसेच त्यातील प्रयोगशील अधिकाऱ्यांना वैयक्तिक स्वरूपाचे पुरस्कार ‘कोजन असोसिएशन’कडून दिले जातात.

यंदा वैयक्तिक श्रेणीत १६, संस्थात्मक श्रेणीत सुवर्ण, रौप्य, कांस्य चषक तसेच इतर १२ विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी विजयी ठरलेल्यांना विशेष पारितोषिक विजेते म्हणून सन्मानित केले जाईल, असे कोजन असोसिएशनच्या मुख्यालयातून सांगण्यात आले.

प्रथम श्रेणीतील सहवीज निर्मिती प्रकल्प (जादा बॉयलर क्षमता गट) ः सहकारी गटात प्रथम क्रमांक- श्री दत्त सहकारी साखर कारखाना (शिरोळ), खासगी गटात प्रथम - निरानी शुगर्स (कर्नाटक), कमी बॉयलर क्षमता गट ः सहकारीत प्रथम - चिदानंद बसवप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना (कर्नाटक) व खासगीत प्रथम - बलरामपूर चिनी मिल्स (उत्तर प्रदेश)

द्वितीय श्रेणीतील सहवीज निर्मिती प्रकल्प (जादा बॉयलर क्षमता गट) ः सहकारी गटात प्रथम क्रमांक- तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना, खासगी गटात प्रथम - सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी, कमी बॉयलर क्षमता गटात ः सहकारीत प्रथम - क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, व खासगीत प्रथम - उद्यागिरी शुगर अॅण्ड पॉवर लिमिटेड.

तृतीय श्रेणीतील सहवीज निर्मिती प्रकल्प (जादा बॉयलर क्षमता गट) ः सहकारी गटात प्रथम क्रमांक विभागून- सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व पूर्णा सहकारी साखर कारखाना. खासगी गटात प्रथम - राजश्री शुगर्स व केमिकल्स (तमिळनाडू). कमी बॉयलर क्षमता गटात ः खासगीत प्रथम- श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना.

उत्कृष्ट (जलशुद्धीकरण) डीएम प्लांट व्यवस्थापक ः सहकारी व जादा बॉयलर क्षमता गटात - मल्लिकार्जन शिवाप्पा राजमाने (श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर), खासगी व कमी बॉयलर क्षमता गटात - अशोक मिश्रा (दालमिया शुगर, उत्तर प्रदेश), खासगी व जादा बॉयलर क्षमता गटात (दोघांना विभागून)- विनोद सिंग (दालमिया मिल्स, उत्तर प्रदेश) व किरण धुमाळ (दालमिया शुगर, कोल्हापूर)

प्रथम श्रेणीत उत्कृष्ट सहवीज व्यवस्थापक ः

सहकारी व जादा बॉयलर क्षमता गटात - महेश सालगर (श्री दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर), सहकारी व कमी बॉयलर क्षमता गटात - विठ्ठल करजिगी (चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना, बेळगावी)

उत्कृष्ट विद्युत व्यवस्थापक ः सहकारी व जादा बॉयलर क्षमता गटात - योगेश हुलगेरी (श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना (कोल्हापूर), सहकारी व कमी बॉयलर क्षमता गटात - बाळासाहेब होरे (पांडुरंग सहकारी साखर कारखाना, सोलापूर), खासगी व जादा बॉयलर क्षमता गटात - दयानंद नाडगौडा (निरानी शुगर, कर्नाटक), खासगी व कमी बॉयलर क्षमता गटात - अखिल बिटे (लोकमंगल शुगर, सोलापूर)

उत्कृष्ट सामग्री (इन्स्ट्रुमेंटेशन) व्यवस्थापक ः सहकारी व जादा बॉयलर क्षमता गटात - शेख शाहवली बेपारी (श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना), सहकारी व कमी बॉयलर क्षमता गटात - श्यामगौडा पाटील (चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना, कर्नाटक), खासगी व जादा बॉयलर क्षमता गटात - देवेश कुमार (बलरामपूर चिनी मिल्स, उत्तर प्रदेश), खासगी व कमी बॉयलर क्षमता गटात - विमलानाथन ई.पी. (शक्ती शुगर्स, तमिळनाडू)

पाच प्रकल्पांना विशेष पुरस्कार

मागील व या वर्षीदेखील पुरस्कार पटकाविणाऱ्या पाच प्रकल्पांना यंदा विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यात दालमिया भारत शुगर अॅण्ड इंडस्ट्रीज, डॉ. पंतगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, श्री दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखाना, पांडुरंग सहकारी साखर कारखाना व छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT