Sugar Factory : राज्यातील ४८ साखर कारखान्यांनी ३६५ कोटी रुपये थकवले

Sugarcane : राज्यात २११ साखर कारखाने आहेत. दरम्यान ऊस गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये १ हजार ५३ लाख ९१ हजार टन ऊस गाळप उद्धिष्ट पूर्ण केले होते.
Sugar Factory FRP
Sugar Factory FRPAgrowon
Published on
Updated on

FRP Sugarcane Factory : राज्यात २११ साखर कारखाने आहेत. दरम्यान ऊस गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये १ हजार ५३ लाख ९१ हजार टन ऊस गाळप उद्धिष्ट पूर्ण केले होते. त्यापोटी कारखान्यांनी ऊसतोडणीसह द्यावयाची एफआरपीची रक्कम ३५ हजार ५३१ कोटी रुपये होती.

प्रत्यक्षात कारखान्यांनी एफआरपीचे तोडणी- वाहतूक खर्चासह ३५ हजार १६६ कोटी रुपये म्हणजे सुमारे ९८.९७ टक्क्यांइतकी रक्कम दिली आहे. परंतु ३६५ कोटी रुपये अद्यापही थकीत असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली.

राज्यातील साखर कारखान्यांनी गतवर्षातील उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीचे अद्याप ३६५ कोटी रुपये थकविले आहेत. त्यामध्ये ४८ साखर कारखान्यांनी ही रक्कम थकविली असून, १६३ कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली.

थकीत एफआरपीप्रश्नी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी संबंधित कारखान्यांच्या सुनावण्या घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली आहे. त्यानंतरही एफआरपीची रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार जप्तीच्या कारवाईचे आदेशही दिलेले आहेत.

Sugar Factory FRP
Sugar Rate : साखरेच्या दरात होणार वाढ ? उसाला योग्य भाव मिळण्याचीही शक्यता

साखर उत्पादन घटणार

२०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन १३७ लाख टन होते. यंदा ते १०५ लाख टनांवर आले. २०२३-२४ च्या हंगामात महाराष्ट्रासह कर्नाटकातील ऊस पट्ट्यात पाऊस न पडल्याने उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) ने ऑगस्ट २०२३ मध्ये महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात १५ टक्क्यांनी घट होऊन १०३ लाख टनांवर जाण्याचा अंदाज वर्तवला होता. WISMA सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन नवीन अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे.

दरम्यान वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी चीनीमंडी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाअभावी परिस्थिती गंभीर होत आहे. जून महिन्यापासून अपेक्षित पाऊस न झाल्याने उसाची वाढ खुंटली असून त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. भविष्यात पाऊस न पडल्यास राज्यातील ऊस उत्पादनात २५ टक्के घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com