Cloudy Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cloudy Weather : ढगाळ वातावरण, धुक्यामुळे हरभरा पिकाला फटका

गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, दिवसभर धुक्याची चादर पसरलेली दिसून येत आहे.

Team Agrowon

तेल्हारा, जि. अकोला ः गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल (Climate Change) झाला असून, दिवसभर धुक्याची चादर (Foggy Weather) पसरलेली दिसून येत आहे. यामुळे रब्बी हंगामात सर्वाधिक लागवड (Chana Cultivation) असलेल्या हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्तवीत आहेत.

तेल्हारा तालुक्यात या वर्षी पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, तूर पिकाचे आधीच नुकसान झाले. तुरीचे पीक आपोआप जागेवरच वाळून गेल्याने अनेकांना फटका बसला. आता वातावरण बदलामुळे हरभऱ्याचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

तालुक्यात या वर्षी बागायती तसेच कोरडवाहू क्षेत्रात हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. आधीच खरिपातील पिकांनी नुकसान दिल्याने रब्बीतून कसर भरून काढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. गेल्या दोन दिवसांतील ढगाळ वातावरणामुळे दिवसभर धुके पडल्यामुळे हरभरा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.

या रब्बी हंगामात मी दहा एकर क्षेत्रांवर हरभरा पेरणी केली आहे. पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे. दोन दिवसांपासून वातावरण बदलामुळे आता हरभरा पीक धोक्यात आले आहे.

- सुदेश शेळके, शेतकरी, चागंलवाडी, ता. तेल्हारा, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: राज्यात आणखी २ दिवस मुसळधारेचा अंदाज; कोकण, घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाची शक्यता

Cage Fish Farming : शेततळ्यात पिंजरा पद्धतीने शाश्वत मत्स्यशेती करणे शक्य

Ujani Dam Pollution : उजनी प्रदूषणाबाबत केंद्र सकारात्मक, राज्य शासन उदासीन

Nandurbar Rain : तळोद्यात दमदार पावसाने पिकांना दिलासा

Agricultural Packaging: पर्यावरणपूरक पॅकेजिंगचा वाढेल वापर

SCROLL FOR NEXT