Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Pune Rain Update : सात धरणांतून विसर्ग

Pune Monsoon Update : जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी काही भागात हलका पाऊस पडला.

Team Agrowon

Pune Weather News : गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक ठिकाणी पिके सुकत असून पावसाअभावी पिके जळून चालली आहेत. या पिकांना जीवदान देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून सात धरणांतून आवर्तन सोडण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी काही भागात हलका पाऊस पडला. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुठा खोऱ्यातील चार धरणक्षेत्रांत मागील दोन दिवसांपासून हलका पाऊस पडत आहे.

रविवारी (ता.१०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत टेमघर धरणक्षेत्रात २७, वरसगाव १४, पानशेत १४ तर खडकवासला धरणक्षेत्रात एक मिलिमीटर पाऊस झाला. खडकवासलातून डाव्या २४१ क्युसेक तर, उजव्या कालव्याला १००५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आले.

नीरा खोऱ्यातील गुंजवणी, नीरा देवघर, पवना, वडिवळे या धरणक्षेत्रात मध्यम पाऊस पडला. तर कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड तुरळक सरी पडल्या.

चासकमानमधून डाव्या कालव्याला ५६० क्युसेक, वीर धरणांतून डाव्या कालव्याला ८२७ क्युसेक, उजव्या कालव्याला १५५० क्युसेकने विसर्ग सोडला आहे. कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, येडगाव, डिंभे, चिल्हेवाडी, घोड धरणक्षेत्रात १.१९ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

पिंपळगाव जोगे धरणांतून डाव्या कालव्यात २६० क्युसेक, वडजमधून डाव्या कालव्यात २०५ क्युसेक, डिंभेतून डाव्या कालव्यात ६००, उजव्या कालव्यात १८० क्युसेक, घोड धरणांतून डाव्या कालव्यात ४५० क्युसेक, उजव्या कालव्यात १५० क्युसेकने विसर्ग सोडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT