VAnashree Award Agrowon
ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, संस्थांना देण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः वन विभागाच्या (Forest Department) सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, संस्थांना देण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांची (Vanashree Award) घोषणा करण्यात आली आहे. २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांच्या पुरस्कारांमध्ये व्यक्ती गटात प्रथम पुरस्कार अनुक्रमे रघुनाथ ढोले (पुणे) आणि किसन गारगोटे (पुणे) यांना जाहीर झाला आहे. १ लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

विविध गटांतील पुरस्कारांमध्ये व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था यांना राज्य, विभाग, जिल्हा पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात येते. राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये सर्व गटांमध्ये पुरस्काराचे स्वरूप एक लाख, ७५ हजार आणि ५० हजार रुपये तर विभागीय गटात ५० आणि ३० हजार रुपये असे स्वरूप आहे.

राज्यस्तरीय २०१८ च्या राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या पुरस्कार्थींची नावे पुढील प्रमाणे

व्यक्ती - रघुनाथ ढोले (पुणे), सुधाकर देशमुख (बीड), रोहित बनसोडे (पुणे)

शैक्षणिक संस्था - कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगांव (नाशिक), एसएमसी इंग्लिश मीडियम स्कूल (वाशीम), शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, कन्नड औरंगाबाद

सेवाभावी संस्था - आधार फाउंडेशन (रुकडी) कोल्हापूर, मराठवाडा जनविकास संघ (पिंपळे गुरव, पुणे), श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ (जळगांव)

ग्रामपंचायत - ग्रामपंचायत बिदाल, ता. माण (जि. सातारा), ग्रामपंचायत पुणतांबा (नगर), चिंचणी (पंढरपूर, जि. सोलापूर)

संस्था - जिल्हा परिषद - कोल्हापूर आणि पोलिस अधीक्षक कार्यालय, सातारा

राज्यस्तरीय २०१९ च्या राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या पुरस्कार्थींची नावे पुढील प्रमाणे

व्यक्ती - किसन गारगोटे (पाषाण, पुणे), सुशांत घोडके (कोपरगाव, नगर), सुनील वाणी (जळगांव)

शैक्षणिक संस्था - मुधोजी महाविद्यालय, फलटण जि. सातारा, कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय, निफाड (नाशिक), स्व. दादासाहेब उंडाळकर महाविद्यालय, कराड (सातारा)

ग्रामपंचायत - गमेवाडी कराड (जि. सातारा), साबुर्डी (खेड, पुणे) लोहसर (पाथर्डी, नगर)

सेवाभावी संस्था - ज्ञानशक्ती विकास वाहिनी, मंचर (जि.पुणे), शिवराज मित्र मंडळ (धानोरी, पुणे), वसुंधरा अभियान (बाणेर, पुणे)

शैक्षणिक संस्था - वनस्पती शास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT