Indian Marriage Agrowon
ताज्या बातम्या

Marriage Fraud : लग्न जमवण्याच्या बहाण्याने शेतकरी तरुणांची फसवणूक

Young Farmer Marriage : शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्‍न गंभीर होत असताना, एकाच मुलीचा दोन शेतकरी मुलांसोबत लग्न लावण्याचा प्रकार गुंजाळवाडी (आर्वी) व खोडद येथे उघड आला आहे.

Team Agrowon

Pune News : शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्‍न गंभीर होत असताना, एकाच मुलीचा दोन शेतकरी मुलांसोबत लग्न लावण्याचा प्रकार गुंजाळवाडी (आर्वी) व खोडद येथे उघड आला आहे. येथील शेतकरी कुटुंबांतील दोन तरुणांबरोबर दीड महिन्यात एकाच मुलीचा (नाव बदलून) विवाह लावून सुमारे साडेचार लाख रुपयांची फसवणूक केली.

यामध्ये नवऱ्या मुलीसह पसार झालेल्या एका महिलेसह तीन एजंटांवर (मध्यस्थी) नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या प्रकरणी एजंट मीरा बन्सी विसलकर (रा. घोटी उभाडे, जि. नाशिक), बाळू गुलाब सरवदे (रा. गुंजाळवाडी आर्वी, नारायणगाव, ता. जुन्नर), शिवाजी कुरकुटे (रा. बोटा, ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सागर प्रभाकर वायकर (वय ३३, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत नारायणगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सागर वायकर हा शेतकरी कुटुंबातील पदवीधर तरुण आहे. ते शेती व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व नोकरी नसल्याने त्यांचे लग्न जमवण्यात अडचण येत होती.

मध्यस्थ बाळू सरवदे व मीरा विसलकर यांनी सागर वायकर यांना संध्या विलास बदादे (वय २३, रा. विठ्ठल नगर, पोस्ट निळवंडी ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे नाव असलेल्या एका मुलीचा फोटो व्हॉट्सॲपवर पाठवला.

त्यानंतर बोलणी होऊन १० मे २०२३ रोजी लग्न करावयाचे ठरले. मुलीची परिस्थिती हालाखीची असून तिला वडील, बहीण, भाऊ नसून आई एकटीच असून ती आजारी असल्याने लग्न करायचे असेल तर मुलीच्या आईसाठी एक लाख तीस हजार रुपये द्यावे लागतील, असे मीरा विसलकर व बाळू सरवदे यांनी सांगितले.

यावर विश्वास ठेवून वायकर पैसे देण्यास तयार झाले. त्या नंतर ठरल्याप्रमाणे १० मे रोजी शिवपार्वती विवाह सोहळा केंद्र भाईकोतवाल चौक, जुन्नर येथे वैदिक पद्धतीने विवाह झाला.

दरम्यान जुन्नर कोर्टामध्ये नोंदणी करण्यासाठी वधू, वर गेले असता वधूच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने नोंदणी झाली नाही. त्या नंतर १७ मे रोजी रोजी पत्नी संध्या हिला मीरा बन्सी विसलकर या माहेरी घेऊन गेल्या. त्या नंतर वारंवार फोन केला. मात्र, आजारी असल्याचे कारण सांगून पत्नी संध्या हिने येण्यास टाळाटाळ केली.

दरम्यान, २८ मे २०२३ रोजी वायकर यांनी मीरा विसलकर यांना फोन केला असता संध्या पळून गेली आहे. तुम्हाला दुसरी मुलगी देते. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करू नका, असे विसलकर यांनी सांगितले. या मुळे आपली फसवणूक झाल्याचा संशय वायकर यांना आला.

दरम्यान, वायकर यांनी चौकशी केली असता, आपल्याबरोबर विवाह झालेल्या मुलीचा विवाह अश्विनी गवारी या नावाने २८ मार्च २०२३ रोजी मीरा विसलकर व शिवाजी कुरकुटे यांनी खोडद येथील हरीश बाळशिराम गायकवाड यांच्यासोबत लावून दिल्याचे आणि त्यानंतर अश्विनी व एजंट पसार झाल्याचे तसेच विवाह जमवण्यासाठी गायकवाड यांच्याकडून विसलकर हिने एक लाख ६० हजार रुपये घेतल्याचे समजले.

एकाच मुलीचा सागर वायकर व हरीश गायकवाड यांच्यासोबत विवाह करून दागिने व रोख रक्कम, अशी सुमारे साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी तीन एजंटांवर गुन्हा दाखल केला.

आळेफाटा येथेही शेतकरी तरुणाची फसवणूक

दरम्यान, याच प्रकारे आळेफाटा येथील तरुणासोबत १८ मे रोजी आळंदी येथील मंगल कार्यालयात विवाह करून अडीच तोळे सोन्याचे दागिने व एक लाख रुपये रोख रक्कम घेऊन फसवणूक झाल्याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Technology : शेतकऱ्यांनी जाणले संरक्षित शेतीचे तंत्रज्ञान

Soybean Procurement : तेवीस दिवसांत दोन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Rabi Season : लातूर विभागात रब्बीच्या २८ टक्के पेरण्या

Electricity Generation : कोयनेतून ९३३ दशलक्ष किलोवॉट वीजनिर्मिती

Sharad Pawar : '...सध्या तरी निवृत्तीचा कोणताच विचार नाही', शरद पवार यांचे निवृत्तीचे वृत्त फेटाळले

SCROLL FOR NEXT