Gokul Annual Meeting
Gokul Annual Meeting Agrowon
ताज्या बातम्या

Gokul Annual Meeting : ‘गोकुळ’च्या सभेत प्रचंड घोषणाबाजी, गोंधळ

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (Kolhapur Milk Producer Association)(गोकुळ) वार्षिक सभेत (Gokul Milk Annual Meeting) सोमवारी (ता. २९) गोंधळ झाला. प्रश्नोत्तरापेक्षा माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि मुश्रीफ (Hasan Mushrif) गटाच्या विरोधात महाडीक (Mahadik Group) गटाच्या सभासदांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने सभास्थळी परस्परविरोधी घोषणांची रणधुमाळी झाली. दूध संघाच्या प्रश्नांवरून सभेत चर्चा होण्यापेक्षा राजकीय वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न या सभेत झाला.

दुपारी एक वाजता सभेला सुरुवात झाल्यानंतर अध्यक्ष विश्वास पाटील यांनी ‘गोकुळ’चा ताळेबंद मांडण्यास प्रारंभ केला. तत्पूर्वीच गोकुळच्या महाडीक गटाच्या संचालिका शोमीका महाडीक यांनी सभासदांना बसण्यास जागा नसल्याचे कारण देत आपणही सभासदांच्या बरोबरच खाली उभे राहू असे सांगत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. उत्पादकांना अनेक आश्वासने देऊन सत्तेवर आला आहात. पण विचारलेल्या प्रश्नांची डोळ्याला डोळे भिडवून उत्तरे देण्याची हिंमत नाही का? अशी विचारणा सौ. महाडीक यांनी केली. महाडीक आपल्या समर्थकांसह उशिरा सभास्थळी आल्या. यानंतर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली.

अध्यक्ष विश्वास पाटील यांनी चाळीस मिनिटे भाषण करत गोकुळच्या अनेक निर्णयाविषयी माहिती दिली. गोकुळ दूध संघाच्या उलाढालीत गेल्या वर्षीपेक्षा ३७८ कोटीने वाढ झाली आहे. त्यामुळे भाग भांडवल ५९ कोटी १७ लाख रुपये इतके झाले आहे. गेल्या वर्षांमध्ये गोकुळने अनेक बाबींमध्ये बचत केली. यामुळे दूध वाहतूक टँकर भाडे कपात, अतिरिक्त रोजंदारी कर्मचारी कपात, महानंदा दूध पॅकिंग खर्च बचत, दूध वाहतूक टेम्पो भाडे या सर्व घटकांमध्ये बचत करून दहा कोटी रुपये वाचवल्याचे सांगितले. यावर्षी विविध कारणांमुळे दूध संकलनात घट झाल्याचे त्यांनी सांगितले. गोकुळला गेल्या आर्थिक वर्षात आठ कोटी ४५ लाख रुपयांचा नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.

ही सभा सुरू असताना विरोधक महाडीक गटाने बाहेर समांतर सभा घेतली. अनेक प्रश्नांची उत्तरे सत्ताधाऱ्यांनी दिली नसल्याने सभासदांची फसवणूक होत असल्याचे सांगितले. यावेळी आत सत्ताधाऱ्यांची सभा आणि बाहेर विरोधकांची सभा असे दृश्य दिसले परिणामी शेवटपर्यंत घोषणाबाजी होतच राहिली. सुमारे एक तासाच्या अध्यक्ष व कार्यकारी संचालकांच्या भाषणानंतर सभा संपविण्यात आली. यावेळी गोकुळचे सर्व संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.

सभेच्या ठिकाणी माजी मंत्री व सत्ताधारी गटाचे प्रमुख सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची उपस्थिती होती. ते खालीच बसले होते. सभा संपल्यानंतर श्री. पाटील व श्री. मुश्रीफ यांना सभासदांनी उचलून घेऊन बाहेर नेले. विविध योजना आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले. यावेळी विविध प्रकारचे अकरा ठराव मंजूर करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT