Anil deshmukh Agrowon
ताज्या बातम्या

चांदीवाल आयोगाची अनिल देशमुख यांना ‘क्लीन चीट’?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांबाबत चौकशीसाठी नेमलेल्या चांदीवाल आयोगाने ‘क्लीन चीट’ दिल्याचे समजते.

टीम ॲग्रोवन 

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parmabir Singh) यांनी केलेल्या आरोपांबाबत चौकशीसाठी नेमलेल्या चांदीवाल आयोगाने (Chandiwal Commission) ‘क्लीन चीट’ दिल्याचे समजते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मंगळवारी (ता. २६) हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्याकडे सादर केला. १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपाने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणाचा ईडी आणि सीबीआय तपास करत आहे.

मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईतील १७५० बार आणि रेस्टॉरंटमधून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना दर महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. याच पत्रातील आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची स्थापना केली. या आयोगासमोर येण्यास परमबीर सिंह यांनी टाळाटाळ केली होती. आयोगाने या संबंधित सर्व साक्षीपुरावे तपासले होते. परमबीर सिंह यांनी अज्ञातवासातून आल्यानंतर चांदीवाल आयोगासमोर साक्ष दिली होती. दरम्यान, या प्रकरणी झालेल्या गंभीर आरोपांमुळे देशमुखांना गृहमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली, तसेच त्यांना अटकही झाली. सीबीआयने देशमुख यांच्या घरी अनेकदा छापेही मारले.

चांदीवाल आयोगाचा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंगळवारी सुपूर्द केला आहे. या अहवालात परमबीर सिंह यांनी राज्य सरकार आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले सगळे आरोप खोटे असल्याचे नमूद केल्याचे समजते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT