Rain Updates
Rain Updates Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update:राज्यात हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता

ॲग्रोवन वृत्तसेवा

पुणे : राज्यात मॉन्सून (Monsoon) सक्रिय होऊन पावसाला सुरवात झाली आहे. विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला आहे. आज (ता. २५) विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची (Heavy Rain) , पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विदर्भ, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. आज (ता. २५) पूर्व विदर्भातील अमरावती, गडचिरोली,उत्तर कोकणातील पालघर, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला असून, कमी दाब क्षेत्रापासून पासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मध्य प्रदेशापासून आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, नाशिक, पुणे, अमरावती, गडचिरोली.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

वर्धा, नागपूर, गोंदिया.

विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर जोर

विदर्भासह राज्याच्या विविध भागात पावसाला पुन्हा सुरवात झाली आहे. रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्याच्या विविध भागात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे सर्वाधिक १३७ मिलिमीटर पाऊस पडला. पुण्यातील लोणावळा येथे ११७, तर पेठ येथे १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडला. वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

राज्यात रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

पालघर : डहाणू ६१, जव्हार १०५, मोखाडा ८७, तलासरी १३७, विक्रमगड ८०, वाडा ६८.

रायगड : कर्जत ५४, खालापूर ४२, माथेरान ९६, रोहा ७३, श्रीवर्धन ४९.

रत्नागिरी : लांजा ४२, संगमेश्वर ४३.

ठाणे : मुरबाड ५१.

मध्य महाराष्ट्र :

जळगाव : यावल ६०.

नंदूरबार : अक्कलकुवा ३०, नवापूर ३४.

नाशिक : हर्सूल ८६, इगतपुरी ६४, ओझरखेडा ७२, पेठ १०२, सुरगाणा ८१, त्र्यंबकेश्वर ५५.

पुणे : लोणावळा कृषी ११७, वेल्हे ३९,

सातारा : महाबळेश्वर ६०.

मराठवाडा :

नांदेड : अर्धापूर ३१, माहूर ३३.

विदर्भ : अमरावती : चांदूरबाजार ३३, धामणगाव रेल्वे ३३, मोर्शी ४०.

भंडारा : मोहाडी ६७.

चंद्रपूर : चंद्रपूर ३०, चिमूर ३०, मूल ४९, सावळी ८५.

गडचिरोली : चामोर्शी ४२. गडचिरोली ५५, कुरखेडा ३६, मुलचेरा ३५, सिरोंचा ३२.गोंदिया : गोंदिया ३०.

नागपूर : मौदा ४१, नागपूर ३१, नरखेड ४१, रामटेक ३८, उमरेड ३३.

वर्धा : आष्टी १०६, खारंघा ७५, समुद्रपूर ३२.

यवतमाळ : बाभूळगाव ३६, घाटंजी ३२, पांढरकवडा ४०, यवतमाळ ३४, झारी झामणी ५१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

Kharif Review Meeting : पेरण्याआधी बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

Earthquake Migration : लोकप्रतिनिधींची मागणी, फरफट सर्वसामान्यांची

Fodder shortage : नाशकात चाऱ्या टंचाईवरून विरोधाभास? पशुपालकांची चिंता; प्रशासन निर्धास्त

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

SCROLL FOR NEXT